शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडेपाच कोटींना गंडा; माजी नगरसेवक उदय जोशीवर गुन्हा दाखल

By विवेक भुसे | Updated: September 24, 2023 11:39 IST

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदय जोशी हे सदाशिव पेठेतून भाजपचे नगरसेवक होते.

पुणे : गॅस एजन्सीमध्ये रक्कम गुंतविल्यास बँकेपेक्षा चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून कोट्यावधींची बेकायदेशीरपणे ठेवी घेऊन लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक उदय त्र्यंबक जोशी (वय ६५) आणि त्यांचा मुलगा मयुरेश उदय जोशी (वय ४६, रा. पानमळा) यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत ९ जणांची ५ कोटी ५३ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारी समोर आल्या असून जवळपास १०० जणांची फसवणूक केली असल्याचे समजते.याबाबत मंगेश जगदिश खरे (रा. सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जुलै २०२१ ते ६ डिसेबर २०२२ दरम्यान घडला. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदय जोशी हे सदाशिव पेठेतून भाजपचे नगरसेवक होते. महिला आरक्षणानंतर त्यांच्या पत्नीही नगरसेविका होत्या. त्यांच्या मुलगा मयुरेश जोशी याला गॅस एजन्सी मिळाली होती. त्याच्या श्रीराम गॅस एजन्सीमध्ये रक्कम गुंतविल्यास बँकेपेक्षा चांगला परतावा देण्याचे आमिष उदय जोशी याने दाखविले. फिर्यादी यांनी ९ लाख १० हजार रुपये गुंतविले. तसेच फिर्यादीचे आईचे बँक खात्यातून ५ लाख रुपये श्रीराम गॅस एजन्सीत गुंतविले. मयुरेश जोशी याने रिझर्व बँक ऑफ इंडियाची कोणतीही परवानगी नसताना वार्षिक १२ टक्के व्याजाच्या खोट्या एफडी सर्टिफिकेटस फिर्यादीला दिल्या. त्यावर आजपर्यंत कोणताही परतावा न देता, फिर्यादीची १४ लाख १० हजार रुपयांची फसवणुक केली.

फिर्यादी यांनी त्यांच्याकडे पैसे परत मागितले असता त्यांना तुला तुझ्या जीवाची भिती वगैरे वाटत नाही काय अशी धमकी दिली. फिर्यादी यांच्याप्रमाणे उदय जोशी यांनी अनेकांची अशा प्रकारे फसवणूक केली आहे. त्यापैकी फिर्यादी अन्य ८ जणांनी पुढे येऊन तक्रारी दिल्या असून त्यांची ५ कोटी ५३ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. जवळपास १०० जणांची २५ कोटी रुपयांवर फसवणूक झाल्याचे सांगितले जात आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला असून पोलीस निरीक्षक मोरे तपास करीत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी