शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

दोन वर्षांत ५०६ जणांचा मृत्यू

By admin | Updated: April 11, 2016 00:51 IST

दुचाकी चालविताना कायद्याने सक्ती असलेल्या हेल्मेटच्या वापराकडे दुर्लक्ष करणे पुणे शहरातील युवावर्गाला चांगलेच महागात पडत आहे.

पुणे : दुचाकी चालविताना कायद्याने सक्ती असलेल्या हेल्मेटच्या वापराकडे दुर्लक्ष करणे पुणे शहरातील युवावर्गाला चांगलेच महागात पडत आहे. गेल्या दोन वर्षांत (जानेवारी २0१४ ते डिसेंबर २0१५ या कालावधीत) पुणे शहरात तब्बल ५0६ दुचाकीचालकांना आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या मृत्युमुखी पडलेल्या चालकांमध्ये सर्वाधिक ९0 टक्के युवक आहेत, तर १0 टक्क्यांमध्ये प्रौढ व्यक्ती तसेच महिलांचा समावेश आहे. तर या दोन वर्षांत अपघातांमध्ये हेल्मेट घातल्यानंतरही २ जणांना आपला प्राण गमवावा लागला असून, हेल्मेट असतानाही डोक्यावरून अवजड वाहनांचे चाक गेल्याने या दोन्ही दुचाकीचालकांचे प्राण गेलेले आहेत. शहरात गेल्या दशकभरात दुचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, हा आकडा २५ लाखांच्या वर गेला आहे. तर दर वर्षी जवळपास दोन लाख नवीन वाहनांची नोंदणी होत आहे. त्या प्रमाणात शहरात दुचाकी चालविणाऱ्यांकडून हेल्मेट घालणाऱ्यांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात पुणे शहरात दुचाकींचे जवळपास ८00 हून अधिक गंभीर अपघात झाले आहेत. त्यात सुमारे ५0६ चालकांनी आपले जीव गमावले आहेत. या चालकांनी हेल्मेट घातले नसल्याची नोंद आहे. तर यामध्ये सुमारे ९0 टक्के २१ ते ३५ या वयोगटातील युवक आहेत.