शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यासाठी ४७९ कोटी ७५ लाखांचा आराखडा - गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 07:09 IST

कृषि, ग्रामीण विकास, उर्जा, सामाजिक व सामुहिक सेवा, वाहतुक व दळणवळण, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसह जिल्ह्यात विविध विकास कामे करण्यासाठी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षांसाठी जिल्हा वार्षिक योजने

पुणे : कृषि, ग्रामीण विकास, उर्जा, सामाजिक व सामुहिक सेवा, वाहतुक व दळणवळण, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसह जिल्ह्यात विविध विकास कामे करण्यासाठी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षांसाठी जिल्हा वार्षिक योजने अतंर्गत ४७९ कोटी ७५ लाख रुपयांच्या सर्वसाधारण विकास आराखड्यास सोमवारी झालेल्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, सर्व आमदार, जिल्हाधिकारी सौरभ राव, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.बैठकीमध्ये कृषि व संलग्न सेवेसाठी ७५ कोटी ९७ लाख ३२ हजार, ग्रामीण विकासासाठी १९ कोटी १५ लाख, पाटबंधारे व पूरनियंत्रणासाठी २६ कोटी ९१ लाख ८६ हजार, उर्जा विकासासाठी २४ कोटी ९० लाख, उदयोग व खाणकामासाठी १ कोटी ७२ लाख, वाहतुक व दळणवळणासाठी ७० कोटी ११ लाख ७५ हजार, सामान्य आर्थ?िक सेवेसाठी १२ कोटी ५० लाख, सामाजिक व सामूहिक सेवेसाठी १३३ कोटी ८२ लाख ६२ हजार, सामान्य सेवेसाठी ४२ कोटी ६८ लाख ७ हजार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी ७१ कोटी ९६ लाख २५ हजार असा एकूण ४७९ कोटी ७४ लाख ८८ हजार रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला.यावेळी मागील वर्षी मंजूर झालेल्या निधीच्या खचार्चा आढावा पालकमंत्री बापट यांनी घेतला. ते म्हणाले, लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाला केलेल्या सूचनांबाबत तात्काळ कार्यवाही करावी. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी अधिका-यांनी लोकप्रतिनिधींशी संपर्क ठेऊन वेळोवेळी कामांची अदययावत माहिती दयावी. प्राप्त निधीतून दजेर्दार कामे करावीत. सर्वसामान्य नागरिक, दिव्यांगांसाठीच्या योजना राबविण्यासाठी गती दयावी,अशा सूचना केली.

टॅग्स :girish bapatगिरीष बापट