शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

शहरात पाणीपट्टीची ४६८ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 21:04 IST

शहरामध्ये आठ लाखांपेक्षा नोंदणीकृत प्रॉपर्टीधारक असताना केवळ १ लाख ६० हजार कुटुंबांकडे अधिकृत नळ जोडणी आहे.

ठळक मुद्देथकबाकीदारांमध्ये औद्योगिक, व्यावसायिक सर्वाधिकअनधिकृत नळ कनेक्शनची संख्या दुपट्ट नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरु थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार

पुणे: शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले उत्पन्न, उत्पन्नाचे स्त्रोत मात्र दिवसेंदिवस कमी होत आहेत, असे असताना शहरामध्ये पाणीपट्टीची थकबाकी तब्बल ४६८ कोटींच्या घरात गेली असल्याची माहिती समोर आली आहे. तर शहरात सध्या केवळ १ लाख ६० हजार अधिकृत नळ कनेक्शन असून अनधिकृत नळ कनेक्शनची संख्या दुप्पट म्हणजे तब्बल साडे तीन लाखांच्या घरात असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली.    शहरामध्ये आठ लाखांपेक्षा नोंदणीकृत प्रॉपर्टीधारक असताना केवळ १ लाख ६० हजार कुटुंबांकडे अधिकृत नळ जोडणी आहे. याबाबत नगरसेवक विशाल तांबे यांनी शहरातील पाणी पुरवठ्याची सद्य:स्थिती, एकूण थकबाकी व अधिकृत नळ जोडणी संख्या याबाबत विचारलेल्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना महापालिकेच्या वतीने वरील माहिती देण्यात आली. यामध्ये सध्या शहरामध्ये घरगुती वापराचे सुमारे १ लाख २२ हजार अधिकृत नळ कनेक्शनच आहेत. तर व्यावसायिक, औद्यागिक वापराचे सुमारे ३८ हजार नळ कनेक्शन आहेत. यातमध्ये घरगुती वापर करत असलेल्या कुटुंबाकडे सुमारे १३७.५७ कोटी रुपयांची तर औद्यागिक व व्यावसायिक वापर करत असलेल्याकडे तब्बल ३३०.१५ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे प्रशासनाने लेखी दिले आहे.     याबाबत पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्ही.जी.कुलकर्णी यांनी सांगितले की, शहरातील नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.थकबाकीदारांमध्ये दुबार पाणीपट्टी, नादुरुस्त मीटर, रस्ते दुरुस्ती, रुंदीकरमध्ये बंद पडलेली नळ कनेक्शन असे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे थकबाकीदारांची संख्या देखील वाढली आहे. पाणीपट्टी वसुलीसाठी अनेक वेळा लोक अदालत भरविण्यात आली, परंतु याला देखील खूप कमी प्रतिसाद मिळत आहे. यामुळे थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका