शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भिगवण येथे ४५ किलो चंदन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 04:38 IST

पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान गुरुवारी २ लाख २५ हजार रुपयांच्या ४५ किलो सुगंधी चंदनासह ५ लाख रुपये किमतीची गाडी दोन आरोपींसह ताब्यात घेतल्याची माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे

भिगवण : पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान गुरुवारी २ लाख २५ हजार रुपयांच्या ४५ किलो सुगंधी चंदनासह ५ लाख रुपये किमतीची गाडी दोन आरोपींसह ताब्यात घेतल्याची माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एन. एम. राठोड यांनी दिली. चंदनाची तस्करी करणारे इंदापूर तालुक्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी असल्याची माहिती पुढे येत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिदास विठ्ठल पवार (वय ३७, रा. वरकुटे खुर्द) तसेच सचिन ज्ञानेश्वर देशमाने (रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. गुरुवारी (दि. ३) भिगवण पोलीस कर्मचारी श्रीरंग शिंदे, रमेश भोसले, अनिल सातपुते भिगवण-राशीन रोडवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत होते. दुपारी ३ च्या सुमारास राशीनकडून भिगवणकडे जाणाºया मोटारीला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता, चालकाने पोलिसांना पाहून गाडी पळविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लागलीच पाठलाग करून जुन्या भिगवण गावातील जाधव पेट्रोल पंपाशेजारी ती गाडी अडविण्यात यश मिळविले. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता, या गाडीतील सीट फोल्ड करून पांढºया रंगाच्या युरियाचा पिशव्यांत सुगंधी चंदनाचे तुकडे ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी गाडी व आतील दोन आरोपींना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. या दोन आरोपींपैकी हरिदास विठ्ठल पवार (वय ३७, रा. वरकुटे खुर्द) तसेच सचिन देशमाने (रा. निमगाव केतकी) हे दोघेही शेतकरी संघटनेचे पदाधिकारी असल्याची माहिती मिळाली. सचिन देशमाने राष्ट्रीय किसान मोर्चाचा अध्यक्ष, तर पवार हा इंदापूर तालुका शेतकरी संघटनेचा उपाध्यक्ष असल्याची माहिती मिळाली. त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण ५ लाख रूपये इतक्या किमतीचा माल जप्त केला आहे.पांढरी कपडे अन् काळे धंदेचंदनाची तस्करी करण्यासाठी आरोपींनी मोटारीचा वापर केला. तसेच, आरोपी देशमाने शेतकरी संघटनेचा पदाधिकारी आहे.स्थानिक दैनिकाचा वार्ताहर म्हणूनही तो काम करीत असल्याची माहिती मिळते. तसेच, आणखीन काही संघटनेचे सदस्य असल्याची ओळखपत्रे सोबत बाळगत असल्याची माहिती मिळाली.तर, पवारवर पूर्वीही चंदनतस्करीचे प्रकरणे असल्याची माहिती मिळाली.