लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात बुधवारी घेण्यात आलेल्या फेरफार अदालतीमध्ये नागरिकांनी उस्फुर्त सहभाग घेतला. तसेच महसुल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पुढाकारामुळे एकाच दिवसांत तब्बल ४२४३ नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात कोरोना संकट, लाॅकडाऊन आणि त्यानंतर आलेल्या निवडणुकांमुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या नोंदीचे, उदा. इकरार, बैंक बोजे, वारस तसेच खरेदीच्या नोंदीचे कामकाज मोठया प्रमाणावर प्रलंबित होते. यामुळेच महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणेसाठी राबविण्यात येणाऱ्या महाराजस्य अभियानाचा भाग म्हणून प्रलंबित असणाऱ्या विविध प्रकारच्या नोंदी मोहीम स्वरुपात निर्गत करण्यासाठी बुधवार रोजी जिल्हाभर फेरफार अदालतीचे आयोजन केले. या अदालतीचे पर्यवेक्षण करण्यासाठी जिल्हा स्तरावरुन संपर्क अधिका-यांच्या नेमणुका केलेल्या होत्या.
संबधित संपर्क अधिकाऱ्यांमार्फत अशा फेरफार अदालतींचे परिणामकारक पर्यवेक्षण केले. या फेरफार अदालतींच्या दिनांक व ठिकाण्णाविषयी गावोगावी व्यापक प्रसिध्दी देणेत आली. या फेरफार अदालतीमध्ये विविध प्रकारच्या नोंदी निर्गत करणेकामी आवश्यक कागदपत्रासह संबंधित पक्षकारांना बोलावून त्यांच्या प्रलंबित नोंदी या जागेवर निर्गत केल्या.
सात बारा अद्यावत करणेकामी जिल्हयातील सर्व मंडळ अधिकाऱ्यांना Digital signature Certificate
(DSC) ऐवजी बायोमॅट्रिक डिव्हाईस खरेदी केले असून, त्याप्रमाणे वाटप करण्यात येत आहे. नोंदी मंजूर करणेकामी खरेदी केले आहेत. तसेच ज्या नोंदीचे अर्ज तलाठी स्विकारणार नाहीत अशा नोंदीबाबतचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात घेणेकामी स्वतंत्र कक्ष उभारणार आहे. तसेच PDE (ई-हक्क प्रणाली) प्रणाली द्वारे नागरिक, खातेदार घरबसल्या नोंदीचे अर्ज करु शकतात.या साठी pdeigr.maharashtra.gov.in या लिंकवर वारस, बोजा, इकरार, बोजा कमी करणे, मयताचे नाव कमी करणे, अ.पा.क कमी करणे या फेरफार प्रकाराचे नोंदीसाठीचे अर्ज करु शकतात. पुणे जिल्हयात या सुविधेचा वापर ३७२ नागरिकांनी घेतला आहे.
--
पुणे जिल्ह्यामध्ये ९५.१२० नोंदी नव्याने घेण्यात आल्या व ८८,११६ नोंदी निर्गत केल्या. जिल्हयामध्ये आतापयंत ७/१२ व ८ अ नागरिकांना पेमेंट गेटवे मधन डिजिटली साईन उपलब्ध आहेत. ऑक्टोबर २०२० ते आजअखेर ३.८८,२८५ इतके ७/१२ व १,६९.६९७ इतके ८ अ व ७२,२८१ फेरफार वितरीत केले असून यापोटी आतापर्यंत शासनास रक्कम ३१,५१,३१५ प्राप्त झाली आहे.
-------
जिल्ह्यात तालुकानिहाय निर्गत झालेले फेरफार
हवेली - ३७४, पिंपरी-चिंचवड-२५५, शिरूर- ४०८, आंबेगाव- ४१४, जुन्नर-३५३, बारामती - ७०४, इंदापूर- ३२४, मावळ - २३६, मुळशी- १०६, भोर-१३८, वेल्हा - ३६, दौंड- ४५३, पुरंदर- २१९, खेड- २४३, एकूण- ४२४३.