शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

Pune: नोकरीच्या आमिषाने चौघांची फसवणूक, तब्बल ४२ लाखांचा गंडा

By भाग्यश्री गिलडा | Updated: November 2, 2023 15:38 IST

एकाच दिवसात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल करण्यात आल्या आहेत....

पुणे : पार्टटाइम जॉबचे आमिष दाखवून पुण्यातील चौघांची फसवणूक केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि. ०१) एकाच दिवसात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल करण्यात आल्या आहेत.

पहिल्या घटनेमध्ये लोहगाव परिसरात राहणाऱ्या मितेश मदनदास गुजराथी (३६) यांनी पोलिसात फिर्यादी दिली. त्यांना अनोळखी क्रमांकावरून पार्टटाइम नोकरी करण्यासाठी व्हाॅट्सॲपवर मेसेज आला. पार्टटाइम नोकरीसाठी सहमत असल्याचे सांगितल्यावर त्यांना एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले. वेगवेगळे टास्क देऊन ते पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगितले. सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर प्रीपेड टास्क, व्हीआयपी टास्क अशी वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार यांच्याकडून तब्बल २२ लाख ८२ हजार रुपये उकळले. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दुसऱ्या घटनेमध्ये धनकवडी परिसरात राहणाऱ्या पुरुषोत्तम शंकर गोणे (२९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पार्ट टाईम जॉब देण्याचे आमिष दाखवून त्यांची ८ लाख १५ हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या घटनेमध्ये बिबवेवाडी परिसरात राहणाऱ्या कार्तिक हरीश गांधी (२७) यांची ५ लाख ८५ हजार रुपये भरण्यास सांगून कोणताही परतावा न देता फसवणूक झाली आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौथ्या घटनेमध्ये, वाघोली परिसरात राहणाऱ्या आशुतोष राजेश हुपरे (३१) यांना चांगला मोबदला मिळेल असे आमिष दाखवून ५ लाख २३ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. प्रत्यक्षात नफ्याचे पैसे काढायला गेल्यावर पैसे निघत नाहीत, असे आल्याने विचारणा केली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि तक्रारदार यांना ग्रुपमधून काढून टाकण्यात आले. याप्रकरणी अज्ञात टेलिग्राम आयडीधारकाविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी