शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

तळजाई वसाहतीत ४१ दुचाकींचे सीटकव्हर फाडले, ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:57 IST

पुणे/सहकारनगर : वारजेमधील गाड्या तोडफोडीची घटना ताजी असतानाच बुधवारी सकाळी तळजाई वसाहतीमध्ये दुचाकी व रिक्षा अशा ४१ वाहनांचे सीटकव्हर फाडण्याची घटना उघडकीस आली आहे़

पुणे/सहकारनगर : वारजेमधील गाड्या तोडफोडीची घटना ताजी असतानाच बुधवारी सकाळी तळजाई वसाहतीमध्ये दुचाकी व रिक्षा अशा ४१ वाहनांचे सीटकव्हर फाडण्याची घटना उघडकीस आली आहे़ याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे़धनंजय गणेश आडागळे (वय १९, रा़ तळजाई वसाहत) आणि रोहित मोहन चव्हाण (वय १९, रा़ तळजाई वसाहत) या दोघांना अटक केली आहे़ त्यांचे साथीदार सूरज ऊर्फ डगºया गायकवाड, सूरज जाधव, शैलेश पवार, पप्पू आगलावे, अनिकेत आगलावे यांच्यासह एका अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना बुधवारी पहाटे चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान तळजाई वसाहतीतील उकिरंडे रेशन दुकानाच्या गल्लीत एकता मित्र मंडळाजवळ घडली़ धनंजय आडागळे व त्याच्या साथीदारांनी परिसरात दहशत पसरविण्याच्या उद्देशाने पहाटे एकत्र येऊन या ठिकाणी पार्क केलेल्या ४१ दुचाकींचे सीटकव्हर; तसेच २ रिक्षांचे हूड फाडले़ गोंधळ घालत हे टोळके निघून गेल्यानंतर नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला़ या प्रकार समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम व त्यांच्या सहकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली़ तेव्हा नागरिक संतप्त झाले होते़ त्यांनी आरोपींना तातडीने पकडण्याची मागणी केली़ या वेळी तेथील २ रिक्षा जागेवर नसल्याचे दिसून आले़पोलिसांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयांनी केलेले चित्रीकरण पडताळण्यास सुरुवात केली़ त्यात एक आरोपी रिक्षा ढकलत असल्याचे आढळून आले़ ही रिक्षा विणकर सभागृहाजवळ सापडली़ तिचा स्वीच बंद करण्यात आला होता़गेल्या काही दिवसांत भाईगिरी करण्यासाठी व परिसरात आपली दहशत निर्माण व्हावी, यासाठी रस्त्यावर पार्क करण्यात आलेली दुचाकी व चारचाकी वाहनांना लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढले आहे़ वारजे परिसरात अशा किमान ३ घटना घडल्या असून बिबवेवाडी, कर्वेनगर, बाणेर, महर्षीनगर या परिसरातही अशा घटना यापूर्वी घडल्या आहेत़।या आधी अशा घटना परिसरात घडल्या होत्या; मात्र या वेळी याचे प्रमाण खूपच जास्त आहे. ४० पेक्षाही जास्त गाड्यांचे नुकसान करण्यात आले आहे. - दादा लोंढे,अध्यक्ष, एकता मित्रमंडळ