शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चाळीस वर्षीय आईने दिले मुुलाला जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 18:04 IST

दोन मुत्रपिंडांपैकी एक मुत्रपिंड निश्चित जागेवर (एक्टोपिक) नाही. तर दुसरे मुत्रपिंड निकामी झाले होते. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे मुत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते.

ठळक मुद्देससूनमध्ये मुत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियामहात्मा फुले जीवनादायी योजनेसह काही संस्था व व्यक्तींनी दिलेल्या निधीतून ही शस्त्रक्रिया

पुणे : बावीस वर्षीय मुलाच्या दोन्ही मुत्रपिंड निकामी...डॉक्टरांनी मुत्रपिंड प्रत्योरोपणाचा सल्ला..पण आर्थिक परिस्थिती बेताची...मग चाळीस वर्षीय आईनेच मुलाला वाचविण्यासाठी स्वत:चे मुत्रपिंड देण्याचा निर्णय घेतला. ससून रुग्णालयाने यामध्ये पुढाकार घेत कोणत्याही खर्चाशिवाय गुरूवारी ( दि. ३ मे ) प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया केली. आईने दिलेल्या मुत्रपिंडामुळे मुलाला जीवनदान मिळाले.नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील माबोरगाव या गावात राजेश पुरी पत्नी व दोन मुलांसह राहतात. हे कुटूंब दारिद्रयरेषेखालील आहे. राजेश पुरी हे मजूर तर पत्नी एकता पुरी या गृहिणी आहेत. बावीस वर्षीय मुलगा शुभम हा वाणिज्य पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. शुभमला ७ वर्षांपासून मुत्रपिंड विकाराचा त्रास होत होता. शुभमच्या दोन मुत्रपिंडांपैकी एक मुत्रपिंड निश्चित जागेवर (एक्टोपिक) नाही. तर दुसरे मुत्रपिंड निकामी झाले होते. त्यामुळे शुभमने चार वेळा नांदेडला डायलिसिस केले होते. किनवट महाआरोग्य शिबिरात शुभमच्या मुत्रपिंड विकाराचे निदान झाले होते. या शिबिरातील डॉक्टरांनी त्यास मुत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता. परंतु प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे त्याला मुत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. खाजगी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाचा खर्च गरीब रुग्णाच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे त्याच्यावर ससून रुग्णालयात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. कुटूंबाबाहेरील व्यक्तीचे मुत्रपिंड मिळण्यासाठी अनेक अडचणी येतात. त्यामुळे शुभमच्या चाळीस वर्षीय आईनेच धाडसी निर्णय घेत मुलाचा जीव वाचविण्यासाठी स्वत:चे मुत्रपिंड देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरूवारी ससूनमध्ये ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. महात्मा फुले जीवनादायी योजनेसह काही संस्था व व्यक्तींनी दिलेल्या निधीतून ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे या कुटूंबावर शस्त्रक्रियेचा आर्थिक भार पडला नाही.रुग्णालयात मुत्रपिंड प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध झाल्यानंतरची ही एकुण पाचवी तर जिवंत व्यक्तीकडून मुत्रपिंड दान केल्यानंतरची दुसरी शस्त्रक्रिया आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. अभय सदरे, डॉ. निरंजन आंबेकर, डॉ. सचिन भुजबळ, डॉ. अमित भंगाळे, डॉ. हरीश टाटिया, भूलतज्ज्ञ डॉ. माया जामकर, डॉ. योगेश गवळी, अर्जुन राठोड, परिचारिका सय्यद यांनी ही शस्त्रक्रिया केली. ----------किनवटहुन एवढ्या दूर अंतरावरून हे कुटूंब ससून रुग्णालयात मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी विश्वासाने आले. ससून रुग्णालयाचा प्रवास सेवाभावी संस्था व अत्याधुनिकतेमुळे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी होण्यापर्यंत झाला आहे. सर्वसुविधांनी युक्त ससून गोरगरीब तसेच मध्यमवर्गीय रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटल