शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

धरणबांधणीत ४० ते ५० टक्के सिमेंटचा अपहार

By admin | Updated: August 20, 2016 05:10 IST

राज्यातील १३६ धरणांपैकी बहुतांश धरणे आवश्यकतेएवढी मजबूत नाहीत, असे एका समितीच्या अभ्यासात दिसून आले आहे. धरण बांधताना ४५ ते ५० टक्के सिमेंटचा अपहार झाला आहे.

पुणे : राज्यातील १३६ धरणांपैकी बहुतांश धरणे आवश्यकतेएवढी मजबूत नाहीत, असे एका समितीच्या अभ्यासात दिसून आले आहे. धरण बांधताना ४५ ते ५० टक्के सिमेंटचा अपहार झाला आहे. धरणांच्या सुरक्षेबाबत सरकारने नेमलेल्या चितळे समितीने धरणसुरक्षेबाबत ज्या निकषांचा आधार घेऊन अभ्यास केला तो जर आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांनी तपासला तर नक्कीच चितळे समितीची छी-थू होईल. जलसंपदा खात्यातील भ्रष्टाचार झाकण्यासाठीच माधवराव चितळे यांच्याकडून असा अहवाल तयार करण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी पत्रकार परिषदेत केला. टेमघर धरणातून गळती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पक्षाच्या प्रवक्त्या प्रीती मेनन-शर्मा, राजेश चौधरी, संदीप सोनवणे आदी उपस्थित होते.पांढरे म्हणाले, ‘‘टेमघरसह वरसगाव, पानशेत, पवना या धरणांवर झाडेझुडपे उगविली आहेत. यावरून कॉँक्रीटमध्ये मातीचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. २०१४ मध्ये टेमघरच्या बाबत सरकारने नेमलेल्या रानडे समितीला अहवाल देण्यासाठी दोन वर्षे लागली. त्यानंतर सध्याच्या सरकारने लगेचच ९५ कोटींचे डागडुजीसाठीचे टेंडर काढण्याचे ठरवले हे संशयास्पद आहे.’’या वेळी प्रीती मेनन म्हणाल्या, ‘‘गिरीश महाजन यांनी श्रीनिवास एंटरप्रायजेस आणि प्रोग्रेसिव्ह एंटरप्रायजेस या कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. वास्तविक या कंपन्यांनी टेमघर धरणाचे काम केले असल्याचा उल्लेख त्यांच्या संकेतस्थळांवर आढळत नाही. धरणाचे बांधकाम सोमा एंटरप्रायजेस या कंपनीच्या नावे असल्याचा स्पष्ट उल्लेख कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर आहे. गुन्हा दाखल करताना जाणीवपूर्वक सोमा एंटरप्रायजेस कंपनीला वगळले आहे. कारण धरणबांधणीच्या वेळी कंपनीचे संचालक अविनाश भोसले होते. त्यांना या प्रकरणातून वाचविण्यासाठी जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला जात आहे. या धरणांच्या दुरुस्तीसाठी जनतेचा पैसा न वापरता संबंधित कंत्राटदाराकडून खर्च वसूल करायला हवा.’’ (प्रतिनिधी)सर्व धरणांचे थर्ड पार्टी आॅडिट करावे सगळ्याच धरणांतून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. टेमघर धरणाला बांधून फक्त १५ वर्षे झालेली आहेत. त्याचे बांधकाम करणाऱ्या सोमा कन्स्ट्रक्शन आणि श्रीनिवास कन्स्ट्रक्शन यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून काम करून घेण्याचे सोडून सरकार जनतेच्या पैशातून धरणाची डागडुजी करत आहे. या कंत्राटदाराला सरकार पाठीशी घालत आहे असे दिसते. महाराष्ट्रातील सर्व धरणांचे थर्ड पार्टी आॅडिट करावे. संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रीती मेनन यांनी केली.‘एबीआयएल’चा संबंध नाहीअविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लि. चे (एबीआयएल) व्यवस्थापकीय संचालक अमित भोसले यांनी दिलेल्या निवेदनानुसार, टेमघर धरणाच्या बांधणीचे कंत्राट श्रीनिवास कन्स्ट्रक्शन आणि प्रोग्रेसिव्ह कन्स्ट्रक्शन या कंपन्यांना दिले होते. त्यांच्याशी एबीआयएलचा काहीही संबंध नाही. त्या काळात एबीआयएल पायाभूत सुविधांच्या व्यवसायात नव्हते.