शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

बेशिस्त वाहनचालक ‘ई’ जाळ्यात, सीसीटीव्ही अन् ई-चलनच्या माध्यमातून ४ महिन्यांत सव्वाआठ कोटींचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 06:47 IST

क्लोज सर्किट टीव्हीच्या जाळ्यात अडकलेले बेशिस्त वाहनचालक आणि थेट कारवाई करून ई-चलनच्या माध्यमातून दंड केलेल्या वाहनचालकांकडून अवघ्या चार महिन्यांतच ८ कोटी २४ लाख ९७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पुणे : क्लोज सर्किट टीव्हीच्या जाळ्यात अडकलेले बेशिस्त वाहनचालक आणि थेट कारवाई करून ई-चलनच्या माध्यमातूनदंड केलेल्या वाहनचालकांकडून अवघ्या चार महिन्यांतच ८ कोटी २४ लाख ९७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तब्बल ३ लाख ५ हजार ८११ वाहनचालकांवर ही कारवाई करण्यात आली. शहर आयुक्तालयाच्या आखत्यारीतील ई-चलन सुरू झाल्यापासून मार्च २०१७ ते २०जुलैअखेरीस सरासरी दरोरज अडीच हजार वाहनचालकांवर कारवाई होत असल्याचे दिसून येत आहे. सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंग न पाळणे, हेल्मेट नसणे, कागदपत्र अपुरी असणे, प्रदूषण चाचणी केल्याचे प्रमाणपत्र नसणे अशा विविध नियमभंगाच्या प्रकरणांचा यात समावेश आहे.केंद्र सरकारने डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून शहरातदेखील ई-चलन यंत्रे पोलीस वाहतूक विभागाला पुरविण्यात आली आहेत.1 या ई-चलन यंत्राद्वारे २९ मार्च ते ३० जुलै २०१७ अखेरपर्यंत ८ कोटी २४ लाख ९७ हजार ९३० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यात १ लाख ७१ हजार ७०३ वाहनचालकांकडून तत्काळ ३ कोटी ८६ लाख ८५ हजार ८२५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर, कारवाई झाल्यानंतर १ लाख ३४ हजार १०८ वाहनचालकांकडून ४ कोटी ३८ लाख १२ हजार १०५ रुपये दंड वसूल करण्यात आला.2याशिवाय, २०१६मध्ये ४६६ आणि २०१७मध्ये जुलैअखेर ३०१ जणांवर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणे आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीप्रकरणी हे खटले दाखल करण्यात आले असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड यांनी दिली. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही बाब समोर आणली आहे.शहरात ३१२ ठिकाणी वाहतूक विभागाने सीसीटीव्ही बसविलेले असून, त्या माध्यमातूनही बेशिस्त वाहनचालकांना वाहतुकीचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठविण्यात येते. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बेशिस्त वाहनचालक दंडाच्या कक्षेत आले आहेत.४सीसीटीव्हीमुळे बहुतांश बेशिस्त वाहनचालक दंडास पात्र ठरले असल्याचेवाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Policeपोलिस