शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मिळकतकर थकविला ३७ शिक्षण संस्थांनी

By admin | Updated: May 23, 2017 05:12 IST

पिंपरी-चिंचवड शहरातील दहा लाखांपेक्षा जास्त मिळकत कराची थकबाकी असलेल्या ३७ शैक्षणिक संस्थांवर

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील दहा लाखांपेक्षा जास्त मिळकत कराची थकबाकी असलेल्या ३७ शैक्षणिक संस्थांवर महापालिकेच्या करसंकलन विभागातर्फे बुधवारपासून जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.पिंपरी-चिंचवड शहरातील साठ मोठ्या थकबाकीदारांच्या मिळकतींवर गेल्या वर्षी जप्तीची कारवाई करून मिळकतकराची वसुली केली होती. तसेच धोरण पुन्हा मिळकतकर विभागातर्फे राबविण्यात येणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील मोठ्या थकबाकीदारांमध्ये काही शैक्षणिक संस्थांचाही समावेश आहे. फेब्रुवारी, मार्चमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा कालावधी, तसेच शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया न जाण्याच्या दृष्टीने महापालिकेमार्फत शैक्षणिक संस्थांवर जप्तीची कारवाई केली नाही. थकबाकी असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या मिळकतींवर जप्तीची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. शंभर टक्के करवसुली करा, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे करसंकलन विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे.पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर शिक्षण संस्था कार्यरत आहेत. मार्चअखेर रुपये एक लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या एकशे तीन शैक्षणिक संस्था आहेत. यामध्ये पन्नास लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या पाच मोठ्या शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. थकबाकी असलेल्या एकशे तीन शैक्षणिक संस्थांपैकी सध्या दहा लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ३७ शैक्षणिक संस्थांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.