शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

पोषण आहारातून ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा

By admin | Updated: June 24, 2015 05:13 IST

या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे़ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सायंकाळी जुन्नरला भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली़

जुन्नर / आपटाळे : बल्लाळवाडी (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना शालेय पोषण आहार व त्याचबरोबर प्रसाद म्हणून दिलेल्या शिऱ्यातून ३१ मुलांना विषबाधा झाली़ या १६ मुले व १५ मुलींवर जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़ मुलांबरोबरच २ शिक्षिका आणि एका पालकावरही उपचार करण्यात येत आहे़ त्यात एका मुलाची प्रकृती गंभीर आहे़ या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे़ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सायंकाळी जुन्नरला भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली़ पोषण आहारातून विषबाधा प्रकरणी मुख्याध्यापकांसह तिघांविरुद्ध ओतूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ मुख्याध्यापक शिवाजी दामोदर डुंबरे, ज्येष्ठ शिक्षक भगवान सखाराम रेंगडे आणि आहार पुरविणाऱ्या सुरेखा चंद्रकांत डोंगरे अशी त्यांची नावे आहेत़ याप्रकरणी विस्तार अधिकारी सुनंदा डुंबरे यांनी फिर्याद दिली आहे़ त्यानुसार शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १८८, किरकोळ व गंभीर स्वरुपाची विषबाधा झाल्याबद्दल कलम ३३७ व ३३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ बल्लाळवाडी येथील या शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग भरतात़ गेल्या आठवड्यात शाळा सुरू झाल्यानंतर, नियमितपणे मुलांना पोषण आहार दिला जातो़ त्याप्रमाणे सर्वांना पोषण आहार दि. २२ जून रोजी दुपारी देण्यात आला़ त्याच बरोबर आहार बनविणाऱ्या सुरेखा डोंगरे यांनी त्यांच्या घरी २१ जून रोजी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचा प्रसाद म्हणून शिरा या विद्यार्थी व विद्यार्थिनींना दिला़ त्यानंतर सर्व मुले घरी गेली़ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज सकाळी नेहमी प्रमाणे भरली; परंतु विद्यार्थी संख्या अचानक मोठ्या प्रमाणावर कमी असल्याचे शाळेतील वर्गशिक्षक व मुख्याध्यापक यांच्या लक्षात आले़ कारण, पटसंख्या ८७ आहे. मुले एवढी कमी कशी आली, याची त्यांनी घरी जाऊन पालकांना विचारणा केली असता, अनेक मुलांना २२ जून रोजी रात्रीपासून उलटी, जुलाब, चक्कर असा प्रकार होत असल्याचे लक्षात आले़ ८७ पैकी ७० मुलांनी खाऊ खाल्ल्यानंतर त्यांना त्रास झाला़ हे लक्षात येताच, पालकांची व शिक्षकांची पळापळ सुरू झाली़ उपसरपंच संजय नायकोडी यांनी तत्काळ रुग्णवाहिका मागवली व विद्यार्थ्यांना जुन्नर येथील छत्रपती शिवाजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर डॉ. शिंगोटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ उपचार सुरू केले़ त्यामुळे सध्या विषबाधित असलेले विद्यार्थी धोकादायक परिस्थितीच्या बाहेर असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. श्याम बनकर यांनी सांगितले. उपचारासाठी दाखल असलेल्या मुल-मुली ही साधारण पाच ते नऊ वर्षं वयोगटांतील असून, त्यांची नावे पुढीलप्रमाणे : वैशाली नायकोडी, रोहन नायकोडी, सिद्धी डोंगरे,विनायक गावडे, आदित्य बोऱ्हाडे, संस्कार डोंगरे, सानिका साळवे, तन्मय गावडे, श्रेया नायकोडी, शुती परिहार, परिमल ससाणे, ज्ञानदा नायकोडी, आविष्कार डोंगरे, राखी आहेर, सूरज नवले, पीयूष डोंगरे, दीपक गाडेकर, यश डोंगरे, रोशनी गावडे, सानिका शिंदे, राहुल शिंदे, धनंजय नायकोडी, श्रावनी कुटे, ज्ञानेश्वरी नायकोडी, साहील नवले, विवेक गावडे, सानिका नायकोडी, आरिया आहेर, सुशीला मुंढे, कृष्णा डोंगरे, सुमीत रोकडे व शिक्षिका लता हांडे, माधुरी पडवळ, पालक शशिकला ससाणे या सर्वांवर जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारासाठी डॉ. सुनील शेवाळे, डॉ़ सागर शिंदे, डॉ़ कमलाकर, डॉ. शिंगोटे यांनी उपचार केले.दरम्यान, शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके म्हणाल्या की, घडलेला प्रकार अतिशय चटका लावणारा असून, विषबाधा नेमकी कशामुळे झाली, याचा तपास झाल्यावर दोषींची गय केली जाणार नाही, अशी माहिती आशाताई बुचके यांनी दिली.