शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

पटसंख्येअभावी ३१ शाळा बंद!

By admin | Updated: September 2, 2016 05:39 IST

कृतियुक्त ज्ञानरचनावादचे धडे व आयएसओ शाळा या उपक्रमांमुळे जिल्ह्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला यश आले

- बापू बैैलकर, पुणे

कृतियुक्त ज्ञानरचनावादचे धडे व आयएसओ शाळा या उपक्रमांमुळे जिल्ह्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला यश आले असले, तरी पटसंख्या शून्य झाल्याने ३१ शाळा बंद कराव्या लागल्या आहेत. २०१० पासून पटसंख्या गळती ही जिल्हा परिषद शाळांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील दर्जेदार शिक्षणामुळे दर वर्षी मोठी गळती होत आहे. २०१२-१३ या वर्षांत पुणे जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या २ लाख ४६ हजार ७६५ इतकी होती. २०१३-१४मध्ये ती २ लाख ३९ हजार ५३० इतकी होऊन ७ हजार २३५ इतकी विद्यार्थी गळती झाली होती. त्यानंतर २०१४-१५मध्ये ३ लाख ३४ हजार ५६० इतकी होऊन गळती ४ हजार ९३४ पर्यंत आली होती. गेल्या वर्षी २०१५-१६मध्ये यात लक्षणीय बदल होऊन पटसंख्या रोखून धरण्यात त्यांना यश आले होते. फक्त ३२६ इतकी गळती झाली होती. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ही गळीत रोखून धरण्यासाठी काही दिवसांपासून दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला. यात आयएसओ शाळा हा उपक्रम व शासनाच्या सूचनेनुसार ज्ञानरचनावादाचे धडे यामुळे गळीत रोखून धरण्यात येऊन गेल्या वर्षी २ लाख ३४ हजार २७० इतका असलेला पट या वर्षी ३० जुलैपर्र्यंत २ लाख ३४ हजार ८२६ इतका झाला असून, पट ५५६ने वाढला आहे. हे कौतुकास्पद आहे; मात्र असे असले तरी कमी पटामुळे शाळा बंद होण्याचे सत्र काही थांबताना दिसत नाही. गेल्या वर्षी ३ हजार ७२४ जिल्हा परिषद शाळा होत्या. डिसेंबरमध्ये शासनाने केलेल्या आॅनलाईन नोंदीत ० ते २० पटसंख्या असलेल्या ५८९ शाळा होत्या. या शाळांचे समायोजनचे आदेश तसल्याने अद्याप ते झाले नाही. पण, गेल्या वर्षीपासून ३१ शाळा कमी पटसंख्या असल्याने बंद केल्याचे शिक्षणाधिकारी मुश्ताख शेख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.