शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

३०८ अंगणवाडी केंद्रांमध्ये वीज, पाणी देण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 23:33 IST

ग्रामीण भागातील अंगणवाड्या स्वयंपूर्ण : शहरातील अंगणवाडी अद्याप दुर्लक्षितच

बारामती : बारामतीच्या ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्र वीज आणि पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत असताना शहरातील अंगणवाड्या मात्र अद्याप दुर्लक्षितच आहेत. तालुक्यातील ३२३ स्वतंत्र इमारतींपैकी ३०८ इमारतींना वीजजोड व नळजोड देण्यात प्रशासनास यश आले आहे. बारामती तालुक्यात ४१७ अंगणवाडी केंद्रे आहेत. त्यापैकी प्रकल्प एकमध्ये २५३ तर प्रकल्प दोनमध्ये १६४ केंद्रांचा समावेश होतो.

प्रकल्प एकमध्ये १८८ अंगणवाडी केंद्रांना स्वतंत्र इमारती आहेत. यामधील १८२ अंगणवाडी केंद्रे विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहेत. तर प्रकल्प दोन मध्ये १३५ अंगणवाडी केंद्रांना स्वतंत्र इमारती आहेत. यामधील १२६ अंगणवाडी केंद्रांना वीज देण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर प्रकल्प एकमधील १८८ अंगणवाडी केंद्र व प्रकल्प दोन मधील १२४ अंगणवाडी केंद्रांना नळजोड देण्यात आले आहेत. विजेच्या खांबाअभावी १५ अंगणवाडी केंद्रांना वीज देण्यात अडचण येत आहे. तर ५ अंगणवाडी केंद्राच्या वीज व नळजोडची कामे प्रगतिपथावर आहेत. मात्र हद्दवाडीनंतर बारामती नगरपालिकेच्या हद्दीत एकूण २२ अंगणवाड्या आल्या आहेत. यापैकी प्रकल्प एकमध्ये माळेगाव, सातववस्ती, बोरावकेवस्ती, ढवाणवस्ती, तर प्रकल्प दोनमध्ये जळोची गावठाण, औद्योगिक वसाहत, मलगुंडेवस्ती, सूर्यनगरी आदी अंगणवाडी केंद्रांना तात्पुरत्या इमारतींची सोय आहे. मात्र शहरातील या अंगणवाड्यांमध्ये सोयी पुरवताना बालविकास प्रकल्प विभागाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे शहराच्या दृष्टीने अविकसित असणाऱ्या ग्रामीण भागातील अंगणवाडी वीज आणि पाण्याच्या बाबतीत स्वंयपूर्ण होत असताना बारामती नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे २२ अंगणवाड्या अडचणीत आल्या आहेत. शहरातील सर्वसामान्यांची हजारो बालके या अंगणवाड्यांमधून शिक्षणाची सुरुवात करत आहेत. मात्र नगरपालिका प्रशासनाला वारंवार विनंती करूनदेखील शहर हद्दीतील अंगणवाडी केंद्रांची दखल घेतली जात नाही.च्बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील दुष्काळाचा परिणाम अंगणवाडी केंद्रावर देखील झाला आहे. गाडीखेल, साबळेवाडी, भिलारवाडी, सोनवडी सुपे काळेवाडी, कारखेल आदी गावांमध्ये पाणी योजनाच नसल्याने येथील अंगणवाडी केंद्रांना नळजोड देण्यात आले नसल्याचे, बालविकास प्रकल्प विभागाच्या वतीने सांगण्यात आले.तालुक्यातील स्वतंत्र इमारती असणाºया अंगणवाडी केंद्रांना वीज व नळजोड देण्यात यश आले आहे. काही ठिकाणी किरकोळ अडचणींमुळे वीज व पाणी देण्यात अडचणी आल्या आहेत. मात्र शहरात या सर्व सोयी अंणवाडी केंद्रांना देण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने पुढाकार घ्यायला हवा.- मिथुनकुमार नागमवाड, बालविकास प्रकल्प अधिकारीबारामती पंचायत समिती

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामती