शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शालेय वाहतूक करणारी 30 वाहने जप्त

By admin | Updated: July 5, 2016 17:32 IST

विद्यार्थी शालेय वाहतूकीसाठी आवश्यक असलेले परवाने तसेच वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र न घेतलेली तब्बल 30 वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मंगळवारी शहरात जप्त केली.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. ५  : विद्यार्थी शालेय वाहतूकीसाठी आवश्यक असलेले परवाने तसेच वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र न घेतलेली तब्बल 30 वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मंगळवारी शहरात जप्त केली. त्यात प्रामुख्याने व्हँन तसेच आॅटोरिक्षांचा समावेश आहे. या वाहन तपासणीसाठी शहरात 12 पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. सकाळी सहा ते दुपारी 12 वाजे पर्यंत ही वाहन तपासणी करण्यात आली असून या पुढेही अशा प्रकारची कारवाई नियमितपणे करण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली. शहरात शालेय वाहतूकीसाठी सुमारे 3 हजार वाहनांची नोंदणी आहे. त्यात जवळपास दोन हजारहून अधिक व्हँन तर इतर स्कूल बसेस आहेत.

या वाहनांची तपासणी शाळा सुरू होण्यापूर्वी व्हावी या उद्देशाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून 15 जुलै पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतरही अनेक वाहनांनी आवश्यक त्या तपासण्या तसेच कादपत्रांची पूर्तता केली नसल्याने 30 जून पर्यंत विशेष सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही अनेक वाहने विना परवाना तसेच तपासण्या न करताच शालेय मुलांची वाहतूक करत होते तसेच क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असल्याचे समोर येत होते. त्यामुळे आज ही धडक मोहीम राबविण्यात आली. त्यात सुमारे 368 वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणी जवळपास 140 वाहनांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. तर 30 वाहने परवाना नसतानाही वाहतूक करत असल्याचे समोर आले. त्यामुळे अशी सर्व वाहने जप्त करण़्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले.

शाळांची उदासिनता...

या कारवाई वरून वाहन मालकांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे. ही वाहतूक करण़्यासाठी वाहनचालकांना आवश्यक असलेला परवाना घेण्यासाठी शाळा तसेच वाहन मालका मध्ये सामंजस्य करार असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक शाळांचे मुख्याध्यापक हा करार करत नाहीत. त्यामुळे विना परवाना वाहतूक करत असल्याची बाब चालक तसेच वाहन मालकांनी प्रादेशिक परिवहन अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान, गेल्या तीन वर्षापासून पोलीस आयुक्त अध्यक्ष असलेल्या जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीच्या माध्यमातून शहरातील शाळांच्या मुख्याध्यपकांच्या विशेष कार्याशाळा घेऊन त्यांना सामंजस्य करार करण्याबाबत सूचना केलेल्या आहेत.

त्यानंतर शाळांकडून एखादी दुर्घटना घडल्यास अडचण येईल या भितीपोटी हा करार केला जात नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या कायद्यानेच शाळांना करारामुळे कारवाई होणार नसल्याचे अभय दिले असल्याने शाळांनी सामंजस्य करारासाठी पुढे यावे असे आवाहन राऊत यांनी केले आहे.