शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

पार्ट्यांवर ३० पथकांची नजर

By admin | Updated: December 30, 2015 03:19 IST

नववर्षांच्या स्वागतासाठी शहर आणि ग्रामीण भागातील हॉटेल, फॉर्म हाऊस आणि पब्ज सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात हजारो पार्ट्यांचे आयोजन केले जात असताना २९ डिसेंबरपर्यंत केवळ

पुणे : नववर्षांच्या स्वागतासाठी शहर आणि ग्रामीण भागातील हॉटेल, फॉर्म हाऊस आणि पब्ज सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात हजारो पार्ट्यांचे आयोजन केले जात असताना २९ डिसेंबरपर्यंत केवळ ६३ आयोजकांनीच परवानगी घेतली आहे. गतवर्षी हीच संख्या दीडशेपर्यंत गेली होती. त्यामुळे करमणूक कर बुडविणाऱ्या आयोजकांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३० पथकांची नेमणूक केली असून, कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिले आहेत.याबाबत राव यांनी सांगितले, की गत वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत अत्यंत कमी लोकांनी थर्टीफर्स्टच्या पार्ट्यांसाठी परवानगी घेण्यासाठी अर्ज केले आहेत. शहर आणि लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन होत असताना आलेले अर्ज खूपच कमी आहेत. त्यामुळेच विनापरवानगी पार्टी करणाऱ्यांवर आयोजकांवर कडक कारवाई करून दहा पट दंड व फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. यासाठी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली ३० पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके परवानगी घेतलेल्या व परवानगी न घेतलेल्या सर्वच हॉटेल्स, पब्ज, फॉर्म हाऊस, लॉन्स आदी ठिकाणी तपासणी करणार आहेत. या तपासणीमध्ये अनधिकृत तिकीट विक्री, मद्यविक्री, परवानगीपेक्षा अधिक लोकांची संख्या असल्यास कारवाई करण्यात येणार आहे.शहरात दर वर्षी सरासरी शंभर ते दीडशे आयोजक करमणूक कर विभागाची परवानगी घेतात. परंतु विविध वृत्तपत्रे, रस्त्यावर लागलेले पोस्टर आणि गुगलवर सर्च दिल्यास एकट्या कोरेगाव पार्कमध्ये पन्नासहून अधिक हॉटेलमध्ये पार्ट्यांचे आयोजन करण्यात आल्याचे निदर्शनास येते.खासगी पार्ट्यांवरही वॉचव्यावसायिक पार्ट्याप्रमाणेच खासगी पार्ट्यांवरदेखील जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेले पथके वॉच ठेवणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने उत्पादन शुल्क विभागाच्या परवानगीशिवाय दोन बाटल्यापेक्षा अधिक मद्य आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे. खासगी पार्ट्यांसाठी आतापर्यंत ८५ गु्रपने परवानगी घेतली आहे.