शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगारांकडून 3 पिस्तुले जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 22:27 IST

लष्कर पोलीस ठाण्यातील तपास पथकाने दोघा सराईत गुन्हेगारांकडून ३ पिस्तूल व १४ जिवंत काडतुसे जप्त केली. ध्रुवबाळ वेडू सुरासे (वय ३६, रा. आडसुरेगाव, ता. येवला, जि. नाशिक) आणि संतोष काशिनाथ सोनवणे (वय ४२, रा. फकीराबादवाडी, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) अशी त्यांची नावे आहेत.

पुणे : लष्कर पोलीस ठाण्यातील तपास पथकाने दोघा सराईत गुन्हेगारांकडून ३ पिस्तूल व १४ जिवंत काडतुसे जप्त केली. ध्रुवबाळ वेडू सुरासे (वय ३६, रा. आडसुरेगाव, ता. येवला, जि. नाशिक) आणि संतोष काशिनाथ सोनवणे (वय ४२, रा. फकीराबादवाडी, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) अशी त्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी सांगितले की, कॅम्प परिसरात तपास पथक गस्त घालत असताना हवालदार शैलेश जगताप यांना जे जे गॉर्डन येथे दोघे जण कमरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खात्री केल्यावर पोलिसांनी दोघांना छापा घालून पकडले. त्यांच्याकडून ३ देशी पिस्टल व १४ जिवंत काडतुसे असा १ लाख ४ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. ध्रुवबाळ सुरासे या सेनादलात नोकरीला होता. त्याला २००९ मध्ये सेनादलातून बडतर्फ करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध येवला पोलीस ठाण्यात २०१३ मध्ये गुन्हा दाखल असून त्याच्याकडून ५ देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले होते. तो सराईत गुन्हेगार असून पुणे शहरात आणखी कोणाला पिस्तूल विक्री केली आहे, याचा तपास करण्यात येत आहे.पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे, सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुवर, संगीता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल चव्हाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेश सोनवणे, हवालदार शैलेश जगताप, गणपत थिकोळे, प्रदीप शितोळे, अमोल शिंदे, अमोल राऊत, पवन भोसले, राहुल शिंगे, सागर हुवाळे, आबासाहेब धावडे यांनी ही कामगिरी केली.

टॅग्स :Puneपुणे