शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीत ३ लाख भाविक, ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष करीत, भंडारा-खोब-याची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 02:26 IST

जेजुरी (जि. पुणे) : श्रावण महिन्यातील सोमवती अमावस्या व शेवटचा सोमवार असल्याने, जेजुरीत आज सुमारे तीन लाखांवर भाविकांनी कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले. सकाळपासून ढगाळ वातावरणात रांगेत उभे राहून भाविक दर्शन घेत होते. ‘सदानंदाचा...येळकोट’च्या जयघोषाने गड दुमदुमून गेला होता.दुपारी १ वाजता पेशव्यांच्या आदेशाने पालखी सोहळा क-हास्नानासाठी काढण्यात आला. या वेळी देवसंस्थानाचे ...

जेजुरी (जि. पुणे) : श्रावण महिन्यातील सोमवती अमावस्या व शेवटचा सोमवार असल्याने, जेजुरीत आज सुमारे तीन लाखांवर भाविकांनी कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले. सकाळपासून ढगाळ वातावरणात रांगेत उभे राहून भाविक दर्शन घेत होते. ‘सदानंदाचा...येळकोट’च्या जयघोषाने गड दुमदुमून गेला होता.दुपारी १ वाजता पेशव्यांच्या आदेशाने पालखी सोहळा क-हास्नानासाठी काढण्यात आला. या वेळी देवसंस्थानाचे प्रमुख विश्वस्त अ‍ॅड. वसंत नाझीरकर, सुधीर गोडसे, विश्वस्त संदीप घोणे, दशरथ घोरपडे उपस्थित होते. गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून सोहळ्याने क-हास्नानासाठी कूच केले. या वेळी देवसंस्थानाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. गडातील व गडकोटाच्या सज्जातील भाविकांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष करीत, भंडारा-खोबºयाची मोठ्या प्रमाणावर उधळण केली. संपूर्ण गडकोट पिवळ्याजर्द भंडा-यात न्हाऊन निघाला होता.आल्हाददायक पावसाळी वातावरणात खांदेकरी, मानक-यांनी उत्सवमूर्तींची वजनाने खूप जड असणारी पालखी खांद्यावर लीलया पेलत गडावरून शहरातील मुख्य नंदी चौकात आणली. तेथून ऐतिहासिक चिंचबागेतील होळकर मंदिराचा मान घेऊन जानूबाई चौकमार्गे सोहळा शिवाजी चौकात आला. पुढे कोथळे रस्त्याने सोहळ्याने क-हा नदीकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी ५ वाजता क-हा नदी वा नाझारे जलाशयात पानी नसल्याने टँकरणे पाणी आणून उत्सवमूर्तींना स्नान घालण्यात आले. यानंतर सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले. रात्री ७ वाजता सोहळा ग्रामदेवता जानूबाई मंदिरासमोर विसावला. येथे ग्रामस्थांनी उत्सवमूर्तींचे दर्शन घेतले. रात्री उशिरा सोहळा गडकोटावर पोहोचला. पेशव्यांनी रोजमुºयाचे वाटप करून सोहळ्याची सांगता झाली.आल्हाददायक पावसात उत्साह शिगेलाआल्हाददायक पावसाळी वातावरणात खांदेकरी, मानक-यांनी उत्सवमूर्तींची वजनाने खूप जड असणारी पालखी खांद्यावर लीलया पेलत, गडावरून शहरातील मुख्य नंदी चौकात आणली. तेथून ऐतिहासिक चिंचबागेतील होळकर मंदिराचा मान घेऊन, जानूबाई चौकमार्गे सोहळा शिवाजी चौकात आला.पुढे कोथळे रस्त्याने सोहळ्याने क-हा नदीकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी ५ वाजता कºहा नदी वा नाझारे जलाशयात पानी नसल्याने, टँकरणे पाणी आणून उत्सवमूर्तींना स्नान घालण्यात आले. यानंतर, सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले.