शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मोटार दुचाकीच्या अपघातात ३ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:08 IST

वडगाव कांदळी : पुणे-नाशिक महामार्गावर भरघाव वेगाने जाणाऱ्या मोटारीने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील पती, पत्नी आणि मुलाचा ...

वडगाव कांदळी : पुणे-नाशिक महामार्गावर भरघाव वेगाने जाणाऱ्या मोटारीने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील पती, पत्नी आणि मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि १८) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली.

राजेश निवृत्ती लेंडे (वय ३८), सुरेखा राजेश लेंडे (वय ३३), यश राजेश लेंडे (वय १२) अशी अपघातात मृत्यू झालेल्या एकाच कुटुंबातील तिघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील भटकळवाडी शिवारातील राजेश निवृत्ती लेंडे हे पत्नी सुरेखा व मुलगा यश यांना घेऊन नारायणगाव येथे कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते. नारायणगावाहून कपडे खरेदी करुन ते परतत असताना जांबुत फाट्याजवळ येडगाव (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत एका माॅलजवळ त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून येणाऱ्या मोटारीने जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता. तिघांचाही जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर मोटारही महामार्गावर दोन तीन पलट्या खाऊन उलटली. यात मोटारीचा चक्काचुर झाला. या घटनेत कारचालक किरकोळ जखमी झाला आहे. मात्र, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने पिंपळवंडी गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोटो : अघातग्रस्त दुचाकी व मोटार कार