शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

गुलटेकडीला पकडली पावणेतीन लाखांची रोकड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 09:37 IST

स्थिर स्थावर पथकाची कारवाई : पैसे, साहित्य, दारू वाटप विरोधी तपासणी कसून

पुणे : लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने पैसे, मद्य आणि वस्तू वाटपाबाबत जागोजागी भरारी पथके आणि पोलीस यंत्रणा वाहनांची तपासणी करीत आहेत. निवडणूक आयोगाने नेमलेल्या स्थिर स्थावर पथकाने पोलिसांच्या मदतीने गुलटेकडी येथील सॅलेसबरी पार्कजवळ पावणेतीन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही रक्कम जप्त करून स्वारगेट पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात मुकुंदनगर येथे एका तेल व्यापाऱ्याकडून २० लाखांची रोकड पहाटे तीनच्या सुमारास पकडण्यात आले होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी, स्थिर स्थावर पथक क्र. १ चे अधिकारी सचिन प्रकाश पवार, आरोग्य निरीक्षक, पुणे महानगरपालिका तथा इलेक्शन मॅजिस्ट्रेट (एसएसटी क्र. १ ३४ - लोकसभा २१२ पर्वती मतदार संघ) हे त्यांच्या सहकाऱ्यांसह गुलटेकडी परिसरात रात्री गस्त घालीत होते. सॅलेसबरी पार्क येथील पुनावाला गार्डनजवळ मंगळवारी मध्यरात्री एकच्या दरम्यान वाहन तपासणी करीत असताना एका मोटारीमध्ये रोकड आढळून आली.

यासंदर्भात पवार यांनी भरारी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत देंडगे यांना या पैशांबद्दल माहिती दिली. उपनिरीक्षक देंडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही रोकड महेंद्र मांगीलाल कावेडीया, (वय ५४, रा. २१४२ न्यु मोदी खाना, कॅम्प) यांची असल्याचे निष्पन्न झाले. लोकसभा निवडणुक अचार संहितेच्या कार्यवाही नुसार ही रोख रक्कम स्थिर स्थावर पथकाचे अधिकारी पवार यांनी जप्ती पंचनामा करून जप्त केली. ही रोकड स्वारगेट पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात जमा करण्यात आली आहे.ही मोटार आणि रोकड महेंद्र कावेडीया यांची आहे. ते त्यांची मोटार घेऊन जात असताना स्थावर पथकाने त्यांची मोटार थांबविली. मोटारीची तपासणी केली असता पावणेतीन लाखांची रोकड आढळून आली. ही रोकड जप्त करण्यात आली आहे.

टॅग्स :pune-pcपुणे