पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तब्बल २७ लाख ९२ हजार मतदार असून, त्या सर्वांना येत्या ५ दिवसांत व्होटर स्लिपचे वाटप करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्ह्यात साडेतीन हजार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यां (बीएलओ)मार्फत या व्होटर स्लीपचे वाटप करण्याचे मोठे आव्हान प्रशासनाच्या समोर आहे. निवडणूक आयोगाने मतदानाची प्रक्रिया अधिक स्वच्छ व पारदर्शक व्हावी, या उद्देशाने प्रत्येक मतदाराला छायाचित्र मतदार ओळखपत्र दिले आहे. मात्र, अनेक ओळखपत्रांवर छायाचित्र नाही; त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतदारांची पडताळणी करणे सुलभ होत नव्हते. ही बाब विचारात घेऊन निवडणूक आयोगाने मतदारांना व्होटर स्लीप देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्लीपमध्ये मतदाराचे छायचित्र, पत्ता, मतदान केंद्र यांची माहिती आहे. स्लीपवर मतदार यादीमधील प्रत्येक मतदाराचे छायाचित्र असण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
२७ लाख व्होटर स्लिप वाटायच्यात!
By admin | Updated: February 17, 2017 04:41 IST