शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रुंदीकरणासाठी २६१ वृक्षतोड

By admin | Updated: February 27, 2017 00:05 IST

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील देहूरोड ते निगडी दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत गेल्या महिन्यात सुरू झाले

देहूरोड : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील देहूरोड ते निगडी दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत गेल्या महिन्यात सुरू झाले आहे. या भागातील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारे एकूण २६१ वृक्ष या भागातील तोडून त्या बदल्यात ७८३ वृक्ष लावण्याचा प्रस्ताव रस्ते विकास महामंडळाने तयार केला आहे.हा प्रस्ताव मान्यतेसाठी देहूरोड लष्करी मुख्यालय प्रमुखांकडे सादर करणार असून, कोणाही नागरिक अगर संस्थांना या प्रस्तावाबाबत आक्षेप असल्यास १ मार्चपर्यंत महामंडळाकडे योग्य कारणांसह तक्रार नोंदविता येणार आहे. देहूरोड कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या हद्दीत निगडी ते देहूरोड येथील किमी २०.४०० ते २४.५०० तसेच २५.५७० ते २६.५४० दरम्यानच्या महामार्गालगत सध्या रस्ते विकास महामंडळाच्या मालकीची २६१ झाडे आहेत. महामार्ग रुंदीकरण करताना सदर झाडे तोडून टाकणार असून, तेथे एकास तीन याप्रमाणे एकूण ७८३ झाडे लावण्याचा प्रस्ताव रस्ते विकास महामंडळाने तयार केला आहे. १५ फेब्रुवारी २०१७ ची सूचना नियमानुसार सर्व २६१ वृक्षांवर चिकटविली आहे. या सूचनेनुसार महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचे जतन सुधारणा अधिनियम १९७५ चे कलम ८/३ अन्वये महामंडळाने जाहीर सूचना दिली आहे. त्यानुसार या भागातील निलगिरी ७, रेन ट्री १२५, कडुलिंब ३४, वड ३६, जांभूळ २, आंबा ७, गुलमोहर २, बाभूळ ५, उंबर १ व चिंच ४२ अशी झाडे तोडून टाकण्याचा प्रस्ताव देहूरोड येथील स्टेशन कमांडर लष्करी छावणी यांच्यासमोर सादर करणार आहे. (वार्ताहर) ।देहूरोड कॅन्टोन्मेन्ट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय यांनी वृक्ष तोडणे व एकास तीन असे वृक्षारोपण करण्याची शिफारस केली आहे. याबाबत आक्षेप असल्यास नागरिक अगर संस्थांनी कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, बांद्रा रिक्लेमेशन बस डेपो, मुंबई यांच्याकडे यांच्याकडे १ मार्चअखेर नोंदविता येणार आहे.