शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयात २६ हजार दावे प्रलंबित

By admin | Updated: June 1, 2015 05:30 IST

मोरवाडी, पिंपरी येथील फौजदारी व दिवाणी न्यायालयात सुमारे २६ हजार दावे प्रलंबित आहेत. त्यामध्ये सुमारे २५ हजार दावे फौजदारी स्वरूपाचे, तर १ हजार ८७२ दावे दिवाणी स्वरूपाचे आहेत

संजय माने, पिंपरीमोरवाडी, पिंपरी येथील फौजदारी व दिवाणी न्यायालयात सुमारे २६ हजार दावे प्रलंबित आहेत. त्यामध्ये सुमारे २५ हजार दावे फौजदारी स्वरूपाचे, तर १ हजार ८७२ दावे दिवाणी स्वरूपाचे आहेत. न्यायाधीश आणि सरकारी वकिलांची संख्या कमी असल्याने हे प्रमाण वाढले आहे. ते कमी व्हावे, यासाठी न्यायालय स्तरावर, तसेच वकील संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. शहराची लोकसंख्या आता २० लाखांच्या घरात पोहोचली आहे. गुन्हेगारी घटनांचे प्रमाणही वाढले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत या भागात कुटुंब न्यायालय, तसेच औद्योगिक न्यायालय गरजेचे आहे. ही न्यायालये उपलब्ध नसल्याने सध्याच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयावर ताण येतो. त्यामुळे प्रलंबित दाव्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. मोरवाडी न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ५ आहे. सरकारी वकील ३ आहेत. पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होेकेट बार असोसिएशनचे सदस्य असलेल्या वकिलांची संख्या ८०० आहे. पुणे अ‍ॅडव्होकट बार असोसिएशनचे सदस्य असलेले अनेक वकील कामकाजानिमित्त या न्यायालयात येत असतात. अशी या न्यायालयातील वकिलांची एकूण संख्या १२०० आहे. या न्यायालयावर येणारा ताण कमी व्हावा, या दृष्टीने विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. प्रलंबित दाव्यांची संख्या कमी होण्यासाठी वेळोवेळी लोकन्यायालयाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये तडजोडीने खटले निकाली काढले जातात. लोकन्यायालय, लोकअदालतच्या माध्यमातून न्यायालयावरील ताण कमी करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यास प्रतिसादही मिळू लागला आहे. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन कुटुंब न्यायालय व्हावे, यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जात आहे.