शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सकाळच्या सत्रात २५.८९ टक्के मतदान

By admin | Updated: February 21, 2017 16:45 IST

जिल्हा परिषदेच्या ७५ गटासाठी १५0 गणासाठी मंगळवार सकाळी साडेसात पासून मतदानाला सुरूवात होवून साडेआकरा वाजेपर्यंत २५.८९ टक्के शांतते मतदान झाले

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 21 : जिल्हा परिषदेच्या ७५ गटासाठी १५0 गणासाठी मंगळवार सकाळी साडेसात पासून मतदानाला सुरूवात होवून साडेआकरा वाजेपर्यंत २५.८९ टक्के शांतते मतदान झाले. मतदार स्लीपा दुर्गम व ग्रामीण भागात न पोहल्याने मतदारांचा थोडासा गोंधळ उडाला. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान होणार आहे. सकाळी शेताला जायचे असल्याने बऱ्यापैैकी मतदार बाहेर पडले. जिल्ह्यात एकूण २७ लाख ९२ हजार ७७३ मदातर असून, यामध्ये १४ लाख ७0 हजार ५0 पुरुष तर १३ लाख २ हजार १८३ महिला मतदार आहेत. यात अन्य १२ मतदार आहेत. यापैैकी सकाळी साडेअकरा वाजेपर्र्यत ७ लाख २२ हजार ९९६ इतके मतदान झाले असून यात ४ लाख ५५ हजार ६२३ पुरूष तर २ लाख ६७ हजार३७३ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

जिल्हा परिषदच्या ७५ गटासाठी ३७५ तर पंचायत समितीसाठी ६४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी प्रथमच जिल्ह्यात राष्ट्रवादी काँगे्रस, काँगे्रस, शिवसेनेसह भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. २ जिल्हा परिषद गट व ९ पंचायत समिती गणात थेट लढती होत असून उर्वरीत सर्व ठिकाणी बहुरंगी लढीत होत आहोत. निवडणुकीसाठी तब्बल २२ हजार २५५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी स्वतंत्र अशा दोन स्वतंत्र ईव्हीएम मशीन देण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात ३ हजार ३६९ केंद्रांसाठी १० हजार २०० बॅलेट युनिट व ७ हजार ४८० कंट्रोल युनिटचे वाटप केले आहे.

जिल्ह्यात ८४ मतदान केंद्रे संवेदनशील असून त्या केंद्रावर केंद्रावर अधिकचा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. २७ लाख ९२ हजरा मतदार स्लीपा वाटपाचे आवाहन जिल्हा प्रशासनावर होते. मात्र मतदान सुरू झाले तरी दुर्गम व डोंगरी भागात या स्लीपा पोहचल्याच नव्हत्या. मतदान यादीच नावे चुकीची होती. तर जन्या मतदार याद्या पाहून कागदावरच मतदान क्रमांक लिहून दिला जात असल्याने मतदान करताना गोंधळ उडत होता.

या निडणुकीत नवमदरांनी आपला मतदानाचा हक्क बाजवला. या मदारांचे काही ठिकाणी गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. जुन्नर तालुक्यात २३ टक्के, दौंडला २३ टक्के, खेडला २५ टक्के, आंबेगावला २५ टक्के, बारामतीला ३५ टक्के , इंदापूरला २४ टक्के, पुरंदर २८ टक्के, शिरुर २८ टक्के, मुळशी ३५ टक्के, हवेली,भोर ३० टक्के, वेल्हा २३ टक्के तर हवेलीला ३० टक्के मतदानाची नोंद झाली होती.