शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

दीड वर्षात २५ ग्रीन कॉरिडॉर

By admin | Updated: April 7, 2017 00:45 IST

कोणताही अवयव वेळेत रुग्णापर्यंत पोहोचला तर त्याचे प्राण नक्कीच वाचू शकतात

पुणे : कोणताही अवयव वेळेत रुग्णापर्यंत पोहोचला तर त्याचे प्राण नक्कीच वाचू शकतात. ग्रीन कॉरिडॉरमुळे ही गोष्ट सहजरीत्या साध्य होत असल्यामुळे रुग्णांसाठी ही संकल्पना वरदान ठरत आहे. आॅगस्ट २०१५ ते मार्च २०१७दरम्यान पुणे विभागात २५ ग्रीन कॉरिडॉर झाले असून, याद्वारे रुग्णांना जीवदान मिळाले आहे. भीषण अपघात आणि त्यात गंभीररीत्या जखमी झालेले रुग्ण... पराकोटीचे प्रयत्न करूनही नाईलाजाने ब्रेनडेड झालेला रुग्ण अशी परिस्थिती ओढवली की नातेवाइकांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. अशा वेळी हृदयावर दगड ठेवून नातेवाईक अवयवदानाचा निर्णय घेतात. त्यांच्या आयुष्यात अंधकार पसरलेला असताना त्यांचा निर्णय दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारा असतो. गेल्या काही वर्षांत अवयवदानाबाबत झालेली जनजागृती, प्रचार आणि प्रसार यामुळे आजवर अनेक रुग्णांना हदय, यकृत, किडनी आदी अवयवांच्या रूपाने नवसंजीवनी मिळाली आहे.गेल्या काही वर्षांपासून अवयवदानाची संख्या वाढत आहे, एखाद्या बाहेरगावाच्या रुग्णालयाला विशिष्ट अवयवाची गरज असेल तर कमीतकमी वेळेत तो अवयव रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’ हा एक खास वाहतूक मार्ग आखण्यात आला आहे. शहरात कोणत्या ठिकाणाहून कोणत्या रुग्णालयाला अवयव जाणार यासह शहराच्या कोणत्या हद्दीपासून रुग्णालयापर्यंतचे किती अंतर आहे, किती सिग्नल्स आहेत, पर्यायी भाग कोणता, याचे नियोजन केले जाते. ज्यामध्ये सर्व सिग्नल मॅन्युअल मोडद्वारे वापरले जातात आणि गरजेनुसार वाहतूक वळवली जाते. यामध्ये शहर, ग्रामीण हद्दीतील वाहतूक पोलीस मोलाची भूमिका पार पाडतात. त्यांच्या चोख कामगिरीमुळेच ही संकल्पना आज यशस्वी झाली आहे. (प्रतिनिधी)ग्रीन कॉरिडॉर म्हणजे काय?ग्रीन कॉरिडॉर ही एक युरोपियन संकल्पना आहे. ज्या वाहनांचा मार्ग लांब आणि वेळ घेणारा असतो, तिथे ही संकल्पना वापरली जाते जेणेकरून ऊर्जा आणि पर्यावरण दोघांचाही दुरुपयोग होत नाही. ग्रीन कॉरिडॉर या वाहतूक मार्गामध्ये सर्व सिग्नल मॅन्युअल मोडद्वारे वापरले जातात आणि गरजेनुसार वाहतूक वळवतात. महाराष्ट्रात पहिल्यांदा ग्रीन कॉरिडॉरचा वापर पुणे ते मुंबई दरम्यान करण्यात आला.आॅगस्ट २०१५मध्ये हृदयासाठी पहिला ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला. त्यानंतर जानेवारी ते डिसेंबर २०१६पर्यंत ९ वेळा यकृत व ८ वेळा मुंबई, दिल्ली, चेन्नई येथे हृदय नेण्यात आले. आॅगस्ट २०१५ ते डिसेंबर २०१६पर्यंत हृदय आणि यकृत मिळून १८ ग्रीन कॉरिडॉर झाले. त्यानंतर मार्च २०१७ अखेरपर्यंत पुणे विभागात ४ हृदय आणण्यात आली. यकृत औरंगाबाद, सोलापूर, नाशिक येथून ३ वेळा आणण्यात आले, असे मिळून पुणे विभागात एकूण २५ वेळा ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले असल्याची माहिती झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन सेंटरच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली. कोणत्या शहरातील कोणत्या रुग्णालयात अवयव प्रत्यारोपणाची नितांत गरज आहे, याची प्रतीक्षायादी झेडटीसीसीकडे तयार असते. नातेवाइकांच्या परवानगीने ब्रेनडेड रुग्णाचे उपलब्ध झालेले अवयव आणि ते कोणत्या रुग्णालयापर्यंत पोहोचवायचे आहे, याचे अचूक नियोजन करून ग्रीन कॉरिडॉर केला जातो. >कमीत कमी वेळेत ग्रीन कॉरिडॉर यशस्वी व्हावे यासाठी वाहतूक पोलीस अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. ग्रीन कॉरिडॉर म्हणजे मिनिटामिनिटांचा हिशेब असतो. रुग्णालयाकडून एखादा अवयव येणे किंवा पाठवणे यासंदर्भात ट्रॅफिक कंट्रोलला माहिती दिली जाते. मग त्या त्या चौकातील वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना सूचित करून नियोजन केले जाते. वाहतूक पूर्णत: थांबवली जाते आणि अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता मोकळा करून दिला जातो. - महेश सरतापे, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा