शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा परवान्यासाठी या ‘२०२०’ मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 03:11 IST

रिक्षा परवान्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) मुलाखतीसाठी चक्क २०२० सालातील तारीख देण्यात येत असल्याच्या घटना शुक्रवारी समोर आल्या. त्यातील एक प्रकार ‘लोकमत’ने आरटीओ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यावर, त्यात तत्काळ सुधारणादेखील करण्यात आली. मात्र, अशा अनेक घटना शहरात घडल्या असल्याने, पुन्हा एकदा संगणक प्रणालीतील त्रुटी समोर आल्या आहेत.

 पुणे : रिक्षा परवान्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) मुलाखतीसाठी चक्क २०२० सालातील तारीख देण्यात येत असल्याच्या घटना शुक्रवारी समोर आल्या. त्यातील एक प्रकार ‘लोकमत’ने आरटीओ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यावर, त्यात तत्काळ सुधारणादेखील करण्यात आली. मात्र, अशा अनेक घटना शहरात घडल्या असल्याने, पुन्हा एकदा संगणक प्रणालीतील त्रुटी समोर आल्या आहेत.रिक्षा परवान्याच्या मुलाखती मिळवून देण्यासाठी एक व्यक्ती कॅशलेस लाच स्वीकारत असल्याचे ‘लोकमत’ने नुकतेच उघड केले होते. परवान्यासाठी अर्ज केलेल्या व्यक्तींनी आॅनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांना आरटीओतील मुलाखतीसाठी तारीख देण्यात येते. या तारखेनुसार अर्जदाराला मूळ कागदपत्र घेऊन आरटीओ कार्यालयात बोलावण्यात येते. तेथे या कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर, पात्र अर्जदाराला परवाना दिला जातो. अनेक अर्जदारांना गेल्या आठवड्यात मुलाखतीची तारीखच मिळत नव्हती. त्याचाच फायदा घेत काही व्यक्तींनी मुलाखतीची तारीख मिळवून देण्यासाठी पेटीएममार्फत लाच स्वीकारण्यास सुरुवात केली होती.पुणे शहर (जिल्हा) वाहतूक सेवा संघटनेचे अध्यक्ष संजय कवडे म्हणाले, आॅनलाईन प्रणालीतील त्रुटी दूर करण्यात अजूनही प्रशासनाला यश आले नाही. त्यामुळे अर्जदारांना नाहक त्रासाला बळी पडावे लागत आहे. एनआयसीला या त्रुटींबाबत कळविण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी सांगितले.तातडीने बदलली तारीखआॅनलाईन लाचेचा प्रकार उघडकीस आणल्यानंतर आरटीओने संगणकीय प्रणालीतील विविध त्रुटींत सुधारणा करण्याची मागणी नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरकडे (एनआयसी) केली होती. मात्र, या मागणीला तीन दिवस उलटायच्या आतच शुक्रवारी नवीन दोष समोर आला. खालीद शेख या अर्जदाराला १६ एप्रिल २०२० ही मुलाखतीची तारीख मिळाली. ही बाब आरटीओ अधिकाºयांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी त्यात तत्काळ सुधारणा करीत २३ नोव्हेंबर २०१७ अशी सुधारित तारीख दिली. मात्र, त्यानंतरही काही जणांना १६ एप्रिल २०२० ही तारीख मिळाल्याचे काही अर्जदारांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.