शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगर येथे २०० ते २५० आधारकार्ड सापडल्याने उडाली खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 16:04 IST

ही आधार कार्ड का टाकण्यात आली, ती कुणाची होती, बनावट आहे का? यांसारख्या एक ना अनेक शंका परिसरात उपस्थित

राजगुरुनगर: राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी सध्या आधारकार्ड गरजेचं आहे. मात्र खरपुडी येथे एका ओढ्यात जवळपास २००ते २५० आधारकार्ड सापडले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पोस्ट ऑफिसच्या प्रशासकीय यंत्रणांमधील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

  आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं ओळखपत्र आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवू शकतात. मात्र, खरपुडी खंडोबा गावाकडे जाणाऱ्या काळे वस्ती (ता. खेड ) येथील वनविभागाच्या नर्सरी समोरील ओढ्यात २००ते २५० आधारकार्ड सापडली आहेत. तसेच सरकारी पोस्टाने एलआयसीच्या नोटिसा, कागदपत्रे, नोटिसा एका गोणीत अज्ञात व्यक्तीने भरून ओढयात टाकल्या होत्या. गोण्यात भरलेली सगळी कागदपत्रे कित्येक दिवस या ओढयात पडून होती. तसेच मध्यंतरी अवकाळी पाऊस झाल्याने काही आधार कार्ड व इतर कागदपत्रे भिजल्याने खराब झाली आहे. सापडलेली आधार कार्ड वाकी, संतोष नगर येथील असल्याचे खरपुडीचे माजी सरपंच मोतीराम काळे, प्रशांत गाडे यांनी सांगितले. या आधारकार्डाची छपाई ६ वर्षांपूर्वी करण्यात आली असल्याचे दिसुन येत आहे. मात्र पोस्टातील कर्मचानी संबंधित ठिकाणी वितरण न केल्याने ही आधारकार्ड नागरिकांपर्यंत पोहोचलीच नाही. त्यानंतर अज्ञात व्यक्तींनी ही आधारकार्ड पिशवीत भरून ओढ्यात फेकल्याची शक्यता आहे. यांची कुणकुण पोस्टमनला लागताच आज (दि३० ) रोजी सकाळी ही आधार कार्ड, व इतर नोटिसा पोस्टमन ओढयातुन गोळा करुन घेऊन गेला असल्याचे समजते. याबाबत ही आधार कार्ड का टाकण्यात आली, ती बनावट आहे का? यांसारख्या एक ना अनेक शंका परिसरात उपस्थित केल्या जात आहे. ...........................................................माझी सहा महिन्यापुर्वी या ठिकाणी बदली झाली आहे. तसेच लॉक डाऊन व पुणे येथे कन्टेंमेन्ट झोनमध्ये मी राहत असल्यामुळे मला या विषयांची माहिती नाही. मी चौकशी करून, माहिती घेऊन दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. गणेश वरुडकर. सब डिव्हीजन ऑफिसर , खेड चाकण )

टॅग्स :KhedखेडPost Officeपोस्ट ऑफिसAdhar Cardआधार कार्ड