शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

हडपसरला कालव्यात बुडून २ मुलींचा मृत्यू

By admin | Updated: November 17, 2016 03:53 IST

शाळेतून घरी परतत असताना छोट्या कालव्याच्या पाईपवरून जाताना तोल गेल्याने दोन शाळकरी मुली बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे.

हडपसर : शाळेतून घरी परतत असताना छोट्या कालव्याच्या पाईपवरून जाताना तोल गेल्याने दोन शाळकरी मुली बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. कालपासून बेपत्ता असलेल्या या दोन मुलींचे मृतदेह कालव्यातील घाण पाण्यात सापडले. हडपसरच्या आठवीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुली शाळेतून बेपत्ता झाल्याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात काल दि. १५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. वैष्णवी संतोष बिराजदार व विद्या कुमार बद्रे (दोघीचे वय १३, रा. बिराजदार फाटा, मांजरी रोड , ता. हवेली) असे बेपत्ता झालेल्या दोन मुलींची नावे आहेत. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दोन्ही मुली साडेसतरानळी येथील ज्ञानप्रबोधिनी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आल्या. दुपारी साडेबाराच्या सुमारास डबा आणण्याचे कारण सांगून त्या शाळेबाहेर पडल्या. रात्री उशिरापर्यंत दोन्ही मुली घरी परतल्याच नाही. पालकांनी परिसरात शोधा शोध केली. शाळेत, नातेवाइकांकडे चौकशी केली. मात्र, शोध लागला नाही. त्यामुळे पालकांनी रात्री उशिरा दोन्ही मुलींचे अपहरण केल्याप्रकरणी तक्रार दिली. वैष्णवीचे कुटुंब हे पूर्वी साडेसतरानळी येथे राहत होते. तर, विद्याचे कुटुंब दोन वर्षांपासून अन्सारी फाटा येथे राहत आहे. शाळेतून घरी जात असताना पाइपवरून जाताना या मुलींचा तोल गेला असावा, त्यामुळे त्या छोट्या कालव्याच्या घाण पाण्यात पडल्या व बुडाल्या. दि. १६ रोजी दुपारच्या सुमारास विद्याचा मृतदेह १५ नं जवळील कालव्यात सापडला, तर नंतर वैष्णवीचा मृतदेह अन्सारी फाटा येथे आढळला. दोघींचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सतीश उमरे करीत आहेत. मुलींच्या घरी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.