शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

मेळाव्यात १८१ जणांना ‘आॅन द स्पॉट’ नोकरी

By admin | Updated: December 17, 2015 02:08 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने पुणे जिल्हा परिषदेत घेतलेल्या मेळाव्यात १८१ गरीब युवक-युवतींना आॅन द स्पॉट नोकरीचे पत्र देण्यात आले. हे सर्व उमेदवार दहावी, बारावी परीक्षा

पुणे : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने पुणे जिल्हा परिषदेत घेतलेल्या मेळाव्यात १८१ गरीब युवक-युवतींना आॅन द स्पॉट नोकरीचे पत्र देण्यात आले. हे सर्व उमेदवार दहावी, बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेले असून, गरीब कुटुंबातील आहेत.ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबासाठी ‘एक कुटुंब एक नोकरी’ देण्याचे शासनाचे धोरण आहे. यानुसार राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बुधवारी जिल्हा परिषदेत हा मेळावा आयोजिला होता. यासाठी ३५१ उमदेवार सहभागी झाले होते. यातील १८१ जणांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. उद्घाटन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, उपायुक्त आर. पी. झेंडे, प्रकल्प संचालक डी. डी. डोके उपस्थित होते. मुलाखतीसाठी एमपीटीए एज्युकेशन, टाटा वेस्टसाईड, जीफोर सिक्युरिटी सर्व्हिस या कंपन्या सहभागी झाल्या होत्या. ग्रामीण भागासह शहर परिसरात त्यांच्या शाखा आहेत. नियुक्तीची पत्रे दिलेल्या उमेदवारांचे ट्रेनिंग घेतले जाणार असून त्यांची कलचाचणीही घेतली जाणार आहे. ८ हजार ९०० पासून १२ हजारापर्यंत वेतन देण्यात येणार आहे. जीफोर सिक्युरिटी सर्व्हिसमध्ये ५६ जणांना सुरक्षारक्षकाची नोकरी मिळाली आहे. एमपीटीए एज्युकेशन संस्थेत ‘कमवा व शिका’ हा उपक्रम असून नियुक्त झालेल्या उमेदवारांना पुढील चार वर्षांत तेथे शिक्षणाबरोबर रोजगाराचीही संधी मिळणार आहे. मेळाव्याचा समारोप जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी कंद यांनी भविष्यात रोजगार मेळाव्याची व्याप्ती वाढवून ग्रामीण भागातील जास्तीत जास्त युवकांना रोजगाराची सधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. यापुढे तालुकानिहाय असे मेळावे जिल्हा परिषदेतच आयोजित करून तालुक्यानुसार बेरोजगारी कमी करण्याचा मानस मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. या वेळी दहावी व बारावी पास झालेले उमेदवार सहभागी झाले होते. यापुढे उच्च शिक्षण घेतलेल्यांसाठीही कंपन्यांतील मागणीनुसार हा उपक्रम राबविणार असल्याचे प्रकल्प संचालक डोके यांनी सांगितले. उमेदवारांना या मेळाव्यात घेऊन येण्यासाठी तालुक्यातील गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी महत्त्वाचे काम केले. (प्रतिनिधी)