शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

१८०० शाळा तंबाखूमुक्त!, व्यसनमुक्तीसाठी पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 01:13 IST

व्यक्तिमत्त्व विकासात शारीरिक आरोग्य अत्यंत महत्वाचे आहे.

कान्हूरमेसाई : व्यक्तिमत्त्व विकासात शारीरिक आरोग्य अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या शरीरातील विविध इंद्रिय संस्था सुरळीतपणे कार्य करतात तेव्हाच आपले आरोग्य चांगले आहे, असे आपण म्हणतो. परंतु, धुम्रपान, तंबाखूसेवन व मद्यपान यांसारख्या घातक सवयी आरोग्यास बिघडवतात. शाळेत जाणाऱ्या १५ टक्के कुमारवयीन मुलांना तंबाखूचे व्यसन असल्याचे वास्तव पुढे आल्याने आता शाळाच तंबाखूमुक्त करण्याचा उपक्रम शासनाकडून राबविला जात आहे. पुणे जिल्ह्यातील १९०० शाळांपैकी १८०० शाळांनी आपली शाळा तंबाखूमुक्त करण्याचा ध्यास धरला असून अनुदानित ९०० शाळा, विनाअनुदानित ५०० शाळा व इतर ४०० शाळा तंबाखूमुक्त झाल्या असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपतराव मोरे यांनी सांगितले.दरवर्षी जगात जवळजवळ ६४ लाख लोक तंबाखूमुळे मरतात. सण २०३० पर्यंत जगात तंबाखूमुळे मरणाऱ्यांची संख्या वर्षाकाठी ८० लाख होणार आहे. भारतात दररोज २ हजार ५०० लोकांचा तंबाखूने मृत्यू होतो. वर्षाकाठी १० लाखांहून अधिक लोक तंबाखूमुळे एकट्या भारतात मरण पावतात. तंबाखूमुळे होणाºया तोंडाचा कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च आॅन कॅन्सर आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार धुम्रपानात ४ हजारांहून अधिक रसायने असल्याचे सांगण्यात आले. धुम्रपानात ८० आणि धुम्ररहीत तंबाखू पदार्थांत २८ कर्कजन्य रसायने असतात. कोणताही प्राणी तंबाखूची पाने खात नाही. तरीही सर्वांत सुज्ञ समजला जाणारा मनुष्य तंबाखूचे सेवन करून स्वत:चेच जीवन नरकमय बनवीत आहे. या तंबाखूच्या व्यसनापासून उद्याची पिढी म्हणजे किशोरवयीन मुले व शिक्षकांना दूर ठेवण्यासाठी शासनाने शाळेत आता तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविणे सुरू केले आहे. या अभियानाला यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षण विभाग कामाला लागला आहे. पुणे जिल्ह्यातील १९०० शाळा तंबाखूमुक्त करण्याचा मानस शिक्षण विभागाचा आहे. या तंबाखूमुक्त शाळांसाठी ११ निकष ठेवले आहेत. त्या निकषांची पूर्तता करून त्याची माहिती अ‍ॅपवर अपलोड करून आपल्या शाळेला तंबाखूमुक्त शाळा घोषित करण्याच्या स्पर्धेत १८०० उतरल्या असल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले. तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम सेवनामुळे केस व तोंडाची दुर्गंधी येते, दात सडतात, हिरड्यांना इजा होऊन दात निकामी होऊन त्याची मजबुती नष्ट होते, चॉकलेटी, पिवळे दात पडतात, वास घेण्याची क्षमता कमी होते, चेहºयावर सुरकत्या पडतात, शरीरात अशक्तपणा जाणवतो, हाडे ठिसुळ होतात व रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊ लागते, डोळ्यांमध्ये जळजळ होऊन पाणी येते, निकोटीनच्या प्रभावामुळे मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो, विचार करण्याची क्षमता कमी होते, चित्त एकाग्र करणे कठीण जाते. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुप्फुस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, पोट, महिलांमध्ये गर्भाशय व मुखाचा कॅन्सर होतो. गँगरीन, क्षयरोग, दमा, हृदयविकार, उच्च रक्तदाब, लकवा, मधुमेह व मोतीबिंदू होतो. पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होत जाते व पुरुष नपुंसक बनतो. ज्या महिला तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात त्यांची प्रजननक्षमता कमी होते व त्यांना वंधत्व येते.>तंबाखू सोडण्यासाठी हे करा...तंबाखू सोडण्याचा विचार करणाºया व्यक्तींनी तंबाखू सोडण्याच्या तारखेची घोषणा आपल्या कुटुंबीयांसमोर, नातलगांसमोर किंवा मित्रासमोर करावी. तंबाखूसाठी प्रवृत्त करतील, अशा लोकांपासून दूर राहावे. तंबाखू सेवनाची इच्छा झाल्यास १ ते १०० अंक मोजावे, दोरीवरील उड्या व प्राणायाम करावा. कुरमुरे, चणे, शेंगदाणे, बडीशेप या पदार्थांचे सेवन करावे, तंबाखू सेवनाने शरीरात असणारी विषारी रसायने शरीरातून बाहेर टाकण्यासाठी जास्तीत जास्त पाणी घ्यावे, योग्य मित्रांसोबत आपले विचार व भावनाशेअर कराव्यात.