ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेत १९ गावे आहेत, त्यापैकी बुधवारी ओतूर शहरासह ९ गावांत तब्बल १८ नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यात ओतूर ८ हिवरे खुर्द ३, खामुंडी ,बल्लाळवाडी, ठिकेकरवाडी,उदापूर ,डुंबरवाडी ,आलमे या प्रत्येक गावात एक एक असे १८ नवीन रुग्ण सापडले आहेत,असे ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी सांगितले.
बुधवारी १८नवीन रुग्ण सापडल्याने परिसरातील. बाधितांची संख्या २ हजार ७०५ झाली आहे. पैकी २हजार ५२०बरे झाले आहेत. ९९ जण कोव्हीड सेंटर ,१० जण घरीच उपचार घेत आहेत. १०६ जणांचा मृत्यू झाला आहे .
गाववार अहवाल देताना डॉ. यादव शेखरे म्हणाले ,
ओतूर शहरात नवीन ८ ,रुग्णामुळे बाधितांची संख्या १ हजार १८४ झाली आहे. पैकी १ ,हजार ११५ बरे झाले आहेत २१ जण कोव्हीड सेंटर तर ७ जण घरीच उपचार घेत आहेत ४१ ,जणांचा मृत्यू झाला आहे.