शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भामा-भीमा नद्यांवरील १८ बंधारे भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:20 IST

आंदोलकांचा विरोध झुगारून अखेर भामा-आसखेड धरणातून नदीपात्रात ७५० क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार असून, त्यातून भामा नदीवरील ८, तर भीमा नदीवरील १० असे एकूण १८ बंधारे भरले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

आसखेड : आंदोलकांचा विरोध झुगारून अखेर भामा-आसखेड धरणातून नदीपात्रात ७५० क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार असून, त्यातून भामा नदीवरील ८, तर भीमा नदीवरील १० असे एकूण १८ बंधारे भरले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी (दि. ९) सकाळी पावणेअकराच्या सुमारास धरणाच्या ‘आयसीपीओ’मधून नदीपात्रात ७५० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, २४ तास सुमारे १५ दिवस पोलीस बंदोबस्त राहणार असल्याचे चाकणचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी सांगितले.उन्हाळी आवर्तन सोडण्यास प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे उशीर झाला होता; परंतु सध्या भामा नदीपात्रात पाणी सोडल्याने खेड तालुक्याच्या पूर्व भागासह शिरूर व दौंड या तालुक्यांतील नागरिकांनी व शेतकºयांनीही समाधान व्यक्त केले आहे.भामा आणि भीमा नदीपात्रांत पाण्याचा खडखडाट व बंधाºयांतील पाणी संपत आल्याने नदीकाठच्या शेतकºयांची बागायती शेती अडचणीत येऊ लागली होती. याशिवाय, काही ठिकाणी पिके जळण्याच्या मार्गावर होती. २९ मार्च रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार १ एप्रिल रोजी पाणी सोडण्यात येणार होते; परंतु आंदोलकांनी अधिकाºयांना निवेदन देऊन ते थांबविले. त्यानंतर ५ एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास भामा-आसखेड धरणातून प्रशासनाने पाणी सोडले. परंतु, आंदोलक त्यांच्या निर्णयावर ठाम होते; त्यामुळे चाहूल लागताच दुसºयाच दिवशी (दि. ६) हजारो प्रकल्पग्रस्त नागरिक करंजविहीरे येथे जमा झाले व त्यांनी धरण विभागाचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांना निवेदन देऊन पाणी बंद करण्यास भाग पाडले. तत्कालीन परिस्थिती पाहून मेमाणे यांनी पाणी बंद करण्याच्या सूचना दिल्या; परंतु त्यानंतर दुसºयाच दिवशी सायंकाळी मेमाणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात आंदोलकांविरुद्ध तक्रार दिली आणि पोलिसांनी १९ आंदोलकांसह अन्य ८० ते १०० जणांवर गुन्हा दाखल केला.सुमारे १३ ते १५ दिवस आवर्तन सुरू राहणार असून, त्यासाठी उपविभागीय अधिकारी राम पठारे, तहसीलदार सुनील जोशी, चाकणचे पोलीस निरीक्षक मनोज यादव, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, भामा-आसखेड धरण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे, भारत बेंद्रे, के. डी. पांडे, नरेंद्र धेंडे यांच्या निरीक्षणाखाली आवर्तन सुरू राहणार आहे.बंदोबस्त : सुमारे ८ ते १० पोलिसांचा ताफा दररोज धरणावर राहणार असून, त्यात एका पोलीस अधिकाºयाचाही समावेश असेल. चाकणचे पोलीस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास गोसावी, पो.हा. संजय जाधव, पो.ना.संदीप रसाळ व सतीश जाधव, होमगार्ड आतिष शिंदे व मारुती केदारी यांचा ताफा सध्या तैनात आहे. आवर्तन बंद करेपर्यंत बंदोबस्त राहणार असल्याचेयादव यांनी सांगितले.