शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत म्युकरमायकोसिसचे १७ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:09 IST

बारामती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या बारामतीकरांवर आता कोविडनंतर उद्भणाऱ्या म्युकरमायकोसिसच्या (काळ्या बुरशी) आजाराच्या संसर्गाचे नवे संकट निर्माण ...

बारामती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या बारामतीकरांवर आता कोविडनंतर उद्भणाऱ्या म्युकरमायकोसिसच्या (काळ्या बुरशी) आजाराच्या संसर्गाचे नवे संकट निर्माण झाले आहे. वर्षभरात या आजाराचे १७ रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोना झाल्यानंतर उपचारानंतर बरा झालेल्या व्यक्तींना या आजाराचा धोका संभावतो. ज्या रुग्णांना इंजेक्शन टॉसिलीझुमॅब, रेमडेसिविर इंजेक्शन दिले आहे किंवा पाच दिवसांपेक्षा जास्त ऑक्सिजन दिला आहे, त्यांनाच नाकामध्ये म्युकरमायकोसिसची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे. वेळीच निदान न झाल्यास अथवा उपचार न मिळाल्यास हा आजार बळावत जातो. यातून रुग्णाचा जबडा किंवा डोळा काढावा लागू शकतो. प्रसंगी प्राणही गमवावा लागू शकतो. बारामतीत या रुग्णांचे प्रमाण हजारी तीन ते चार आहे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.

-------

अशी काळजी प्रथम घ्यावी

कोरोनाची लागण झाल्यानंतर तिसऱ्या व चौथ्या आठवड्यांमध्ये नाक नॉर्मल सलाइनने स्वच्छ करणे, रक्तातील साखरेचे प्रमाण १५ व्या व २२ व्या दिवशी तपासून पाहणे. म्युकरमायकोसिस आहे की नाही हे पाहण्याकरिता नाकातील स्वॅब तपासून घ्यावा.

--------

म्युकरमायकोसिस हा आजार दुर्मिळ असला तरी नवा नाही. वेळीच तपासणी व उपचार केल्यास केल्यास ब्लॅक फंगसचा हा आजार बरा होऊ शकतो. यासाठी रुग्णांनी लक्षणे दिसताच डोळ्यांचे डॉक्टर किंवा कान, नाक व घसा तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे.

-डॉ. सदानंद काळे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय बारामती

--------

डोळे जळजळ करणे, डोळे लाल होणे, डोळे दुखणे अशी लक्षणे सुरुवातीच्या काळात आढळून येतात. मात्र, योग्य वेळी तपासणी व उपचार घेतल्यास हा आजार बरा होतो. अधिक संसर्गानंतर काही रुग्णांमध्ये डोळ्यांच्या खोबणीतून डोळा बाहेरही येतो. यात डोळा गमावण्याची शक्यता अधिक असते.

- डॉ. सचिन पांढरे, नेत्र विभागप्रमुख, उपजिल्हा रुग्णालय बारामती

-----

म्युकरमायकोसिस म्हणजे ही काळी बुरशी आहे, हा नवीन आजार नाही. मात्र, कोरोनानंतर रुग्णांमधील रोग प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने या आजाराचा संसर्ग झपाट्याने होत असल्याचे समोर आले आहे. नाकातून किंवा तोंडातून हा बुरशीचा संसर्ग होतो. या संसर्गाकडे दुर्लक्ष केल्यास तोंड, डोळे, जबडा यातून पुढे मेंदूपर्यंत जाऊन तीव्र आघात करतो. त्यामुळे वेळेत तपासणी व उपचार करावे.

– डॉ. वैभव मदने, कान, नाक, घसा तज्ज्ञ

-----