शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १६ कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:11 IST

इंदापूर : तालुक्यात यंदा अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पुरामुळे नुकसान झाले होते. तसेच, रस्त्यांची दुरवस्था झालेली होती. त्यामुळे दळणवळणच्या ...

इंदापूर : तालुक्यात यंदा अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पुरामुळे नुकसान झाले होते. तसेच, रस्त्यांची दुरवस्था झालेली होती. त्यामुळे दळणवळणच्या दृष्टीने नागरिकांना गैरसोयीचे होत होते. काही ठिकाणी रस्ते वाहून गेले होते. तर, काही ठिकाणी पूल वाहून गेल्यामुळे गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग इंदापूर व भिगवण या दोन्ही विभागात मिळून ३१ कामांसाठी १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

दत्तात्रय भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील पूरहानी झालेल्या भागांची मी पाहणी केली होती. त्यावेळी संबंधित यंत्रणेला तत्काळ व योग्य पध्दतीने पंचनामे करणेबाबत निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने भिगवण विभागात राज्यमार्ग ५४ भिगवण बारामती रस्ता ते मदनवाडी घाट लामजेवाडी रस्ता१७.३८ लक्ष, भवानीनगर जाचकवस्ती काझड अकोले रस्ता राज्यमार्ग ९ रस्ता क्रमांक १३२ ( जाचकवस्ती काझड भाग, वाहून गेलेला भरावासाठी ) ६९.५३ लक्ष, कळस - जंक्शन - वालचंदनगर राजमार्ग १२४ ( कळस ते वालचंदनगर मोऱ्या वाहून गेलेला भराव, कळंबोली पुलाचे रोलिंग ) ९७.३४ लक्ष असे एकूण ३ कामांसाठी १८४.२५ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.

तसेच, लाकडी -कळस रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग ६५ ( मोऱ्यांची दुरुस्ती, रस्त्याचा खराब झालेला भाग करीता) १९.७८ लक्ष, अंथुर्णे शेळगाव रस्ता प्रजिमा ७६ ( शेळगाव भागातील वाहून गेलेला भराव, मोऱ्याचे भराव करीता ) ३४.९४ लक्ष, कळंब लासुर्णे रस्ता ( वाहून गेलेला भराव, मोऱ्याकरिता) २६.३७ लक्ष, भिगवण स्टेशन भिगवण ते राष्ट्रीय महामार्ग ९ रस्ता प्रजिमा ७९ ( मोऱ्या दुरुस्ती व भराव दुरुस्तीव) १.९८ लक्ष, म्हसोबाचीवाडी निरगुडे भादलवाडी डाळज नं.२ कुंभारगाव पोंदवडी शेटफळगडे रस्ता निरगुडे येथील वाहून गेलेल्या तळी पुलाच्या ठिकाणी छोटा पूल बांधणे, डाळज नं.२ येथील वाहून गेलेल्या जुन्या पुलाच्या ठिकाणी नवीन पूल बांधणे ६१३ लक्ष, रणगाव शिरसटवाडी रस्ता ( मोऱ्यांची दुरुस्ती, भराव दुरुस्ती ) १६.४८ लक्ष, कळस शेळगाव रस्ता (कळस शेळगाव येथील वाहून गेलेल्या मोऱ्यांची भराव दुरुस्ती ) ५.९३ लक्ष, खडकी पारवडी शेटफळगडे लाकडी भवानीनगर सणसर कुरवली रस्ता ( कारखान्याजवळील खराब रस्ता दुरुस्ती करणे ) ४६.१५ लक्ष, म्हसोबाचीवाडी लाकडी काझड बोरी लासूण्ण रस्ता ( वाहून गेलेले भराव दुरुस्ती करणे ) १९.७८ लक्ष, बोरी शेळगाव रस्ता ( मोऱ्या दुरुस्ती व भराव दुरुस्ती करणे ) १३.१९ लक्ष, राज्य महामार्ग १२१ अंथुर्णे, भरणेवाडी, बिरंगुडवाडी रस्ता ( मोऱ्यांची व भरावची दुरुस्ती करणे ) ६.५९ लक्ष, राज्यमार्ग ६५ ते पळसदेव - कळस - बोरी रस्ता ( भराव दुरुस्ती ) १३.१९ लक्ष असे एकूण १२ कामांसाठी एकूण ८१८.२६ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.

तसेच इंदापूर विभागात श्रीराम चौक ते इजगुडे पंप ३१.२९ लक्ष, गणेशवाडी पूल व निरा नदीवरील पूल नरसिंहपूर ३४.७६ लक्ष, कॅनॉल मोऱ्या रेडणी ते खोरोची १९.७८ लक्ष, सावंत वस्ती पूल २८.३५ लक्ष, खोरोची गावाजवळचा पूल ७५.८१ लक्ष, कळाशी ते गंगावळण पूल २६.३७ लक्ष, राजेवाडी बॅकवॉटरपूल १६.४८ लक्ष, रेडा ते नीरा भीमा नदीवरील पूल ६२.६३ लक्ष, तरंगवाडी गोडाऊन जवळील पूल दुरुस्ती २३.०७ लक्ष, अगोती नं.१ चांडगाव भराव दुरुस्ती क्रमांक १२७ साठी ४२.८५ लक्ष, अकलूज रस्ता ते शेटफळ हवेली पूल बांधणे ४६.१५ लक्ष, म्हेत्रे वस्तीजवळील पूल शिरसोडी ते इंदापूर १३१.८५ लक्ष, सावंत वस्ती पूल १७.५८ लक्ष, सावंतवस्ती भाटनिमगाव पूल ८.५७ लक्ष, पाणंद रस्ता दुरुस्ती निमगाव केतकी जवळ १६.४८ लक्ष, खोरोची पूल व ३ मोऱ्या दुरुस्ती १९.७८ लक्ष असे एकूण १६ कामांसाठी एकूण ६०० लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्यमंत्र्यांकडून आश्वासनपूर्ती

इंदापूर तालुक्याच्या इतिहासात पडला नसेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे १६५ मिलिमीटर पाऊस कोसळला होता. त्यामध्ये अनेक डांबरी रस्ते, छोटे मोठे पूल वाहून गेले होते. त्यावेळी तालुक्यातील चोहूबाजूच्या नागरिकांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे धाव घेतली होती. त्यानंतर राज्यमंत्री भरणे यांनी तालुक्यातील कानाकोपऱ्यात जाऊन अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करून संपर्क तुटलेल्या गावांना व शेतकऱ्यांना मोठा आधार दिला होता. आणि आता १६ कोटींची कामे मंजूर करून शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे.