बापू बैलकर ल्ल पुणे२८ फेबु्रवारी व १ मार्च रोजी जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ५८ गावांतील १५ हजार ८९२ शेतकऱ्यांचे ६ हजार ३७५ हेक्टरवरील पिके व फळपिकांचे मोठे नुकसान झाले. २ हजार ३५३.१ हेक्टरवरील गहू पिकाचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक फटका जुन्नर तालुक्याला बसला आहे. जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड, शिरूर, दौंड, इंदापूर व पुरंदर तालुक्यांत हा पाऊस झाला होता. तसेच जुन्नर, पुरंदर, शिरूर, दौंड व इंदापूर तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली होती. यात शेती व फळपिकांचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर कृषी विभागाने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यात ४0३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ५0 टक्केपेक्षा कमी, तर ६ हजार ३७५ हेक्टरवरील पिकांचे ५0 टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. या पावसामुळे सर्वाधिक नुकसान जुन्नर तालुक्यातील ४ हजार ३४0.१४ हेक्टरवरील पिकांचे ५0 टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यानंतर मावळ तालुक्यातील १0६३.८३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक गहूपिकाला फटका बसला आहे. २ हजार ३५३.१ हेक्टरवरील गहूपिकाचे नुकसान झाले असून, एकट्या जुन्नर तालुक्यातील १ हजार ९८१ हेक्टरवरील पिकाचा समावेश आहे. त्यानंतर जिल्ह्यात आंबा ८७८.३ हेक्टर, कांदा ७२८.३ हेक्टर, डाळिंब ५५३.४ हेक्टर, हरभरा ४८६.३ हेक्टर, भाजीपाल्याचे ३८४.८४ हेक्टर नुकसान झाले आहे. पुरंदर तालुक्यातही पाऊस झाला होता; मात्र तालुक्यातील फक्त ४.१५ हेक्टरवरील पिकांचे तेही ५0 टक्केपेक्षा कमी नुकसान झाले आहे. या बाबत पुरंदरचे तालुका कृषी अधिकार देवंद्र ढगे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्यांना भरपाई मिळालीच पाहिजे. मात्र या वेळी झालेला पाऊस हा वादळी व गारांचा नसल्याने याचा पिकांवर फारसा परिणाम झाला नाही. तसेच रब्बीची जवळपास सर्व पिके काढली होती. पावसानंतर तत्काळ त्या त्या गावांत जाऊन आम्ही पंचनामे केले आहेत. मात्र १३ व १७ मार्च रोजी झालेल्या पावसामुळे राजुरी, पिसर्वे व रिसे पिसे गावातील सुमारे ९0.८0 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचे ढगे यांनी सांगितले.शिरूर तालुक्यातही गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता.मात्र, त्या तालुक्यात काहीच नुकसान झाले नाही.गहू - २३५३.१हरभरा - ४८६.३ज्वारी - ३३0.२कांदा - ७२८.३द्राक्षे - ५१६.८आंबा - ८७८.३मसूर - ११.0६वाटाणा- १.0बाजरी - ३६.६भुईमूग - ८.४१बटाटा - ८.८७भाजीपाला - ३८४.८४फूलपिके - १0.९४फळपिके - ३२.0२इतर पिके -२८डाळिंब - ५५३.४ऊस - 0.२0केळी - ७.६१असा होतो पंचनामा...४ज्या गावात पाऊस किंवा गारपीट होते, तिथे त्या गावातील तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीकपाहणी करतात. ४त्यांच्याकडे माहितीचा नमुना असतो. त्यात माहिती भरून घेतली जाते. ४त्यानंतर गावातील पाच पंचांच्या सह्या घेतल्या जातात. नंतर क्षेत्र निश्चित केले जाते.जुन्नरमध्ये गहू, आंबा व द्राक्ष बागांना मोठा फटका बसला. तालुक्यात ३00 हेक्टरवर आंबा लागवड आहे. त्यातील २५0 हेक्टर आंब्याचे नुकसान झाले. कोकणनंतर जुन्नरचा आंबा बाजारात मोठ्या प्रमाणात असतो. मात्र, ५0 टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याने आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. गहूपीक पूर्ण आडवे झाले. साडेचार हेक्टरवर लागवड होती. त्यातील १ हजार ९८१ हेक्टरवर नुकसान झाले. द्राक्षासाठीही जुन्नर तालुका प्रसिद्ध आहे. मात्र, त्यालाही मोठा फटका बसला.- भारत वाणी, तालुका कृषी अधिकारी, जुन्नर
अवकाळीचा फटका १५,८९२ शेतकऱ्यांना
By admin | Updated: March 27, 2015 23:18 IST