शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मिनी बस उलटल्याने १५ भाविक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 03:48 IST

अष्टविनायकच्या दर्शनासाठी निघालेल्या मिनी बसचालकाचा बसवरील ताबा सुटल्याने वळणावर बस उलटल्याने झालेल्या अपघातात जीवितहानी झाली नसली

लोणी काळभोर : अष्टविनायकच्या दर्शनासाठी निघालेल्या मिनी बसचालकाचा बसवरील ताबा सुटल्याने वळणावर बस उलटल्याने झालेल्या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी पिंपरी-चिंचवड परिसरातील १५ नागरिक जखमी झाले आहेत.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : याप्रकरणी संदेश धोंडिराम पुजारी (वय ३६, रा. बोरा पार्क, पिंपळे सौदागर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. हा अपघात थेऊर फाटा ते थेऊर गाव यादरम्यानच्या रस्त्यावर, गाढवेवस्तीनजीक झाला. संदेश पुजारी पत्नी, दोन मुले व शेजारील पाच कुटुंबे आपल्या मुलांसह मिनी बस (एमएच १४ सीडब्ल्यू ०१५०) अष्टविनायक यात्रेसाठी निघाले होते. बसमध्ये लहान मुलांसह एकूण वीस जण होते. त्यापैकी पंधरा जण जखमी झाले आहेत.या अपघातात बहुतेक जखमींना हात-पाय, खांदा, डोके या ठिकाणी मार लागला आहे. किरकोळ जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. उर्वरित जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हवालदार बाळासाहेब गव्हाणे अधिक तपास करीत आहेत.मोरगावच्या मयूरेश्वराचे दर्शन घेऊन हे सर्व जण थेऊरकडे निघाले होते. त्यांची मिनी बस थेऊर फाट्यावरून थेऊर गावाकडे निघाली होती. सकाळी साडेदहा वाजता बस गाढवेवस्तीजवळच्या वळणावर चालक बालाजी पांडुरंग मुंढे (रा. काळेवाडी, पिंपरी) याचा बसवरील ताबा सुटल्याने बस डाव्या बाजूला उलटली. त्या वेळी गाडीचे तोंड विरुद्ध दिशेला झाले. बसमधील बहुतेक सर्वांना मार लागला. तेथे जमलेल्या नागरिकांनी व हवालदार बाळासाहेब गव्हाणे, लोकेश राऊत या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.