शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

सराफांच्या बंदमुळे १४०० कोटींची उलाढाल ठप्प

By admin | Updated: March 15, 2016 04:19 IST

केंद्रीय अंदाजपत्रकात सोन्याच्या दागिन्यांवर लावण्यात आलेल्या एक टक्का अबकारी कराविरोधात सराफांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे मागील चौदा दिवसांत चौदाशे कोटींच्या उलाढालीवर

पुणे : केंद्रीय अंदाजपत्रकात सोन्याच्या दागिन्यांवर लावण्यात आलेल्या एक टक्का अबकारी कराविरोधात सराफांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे मागील चौदा दिवसांत चौदाशे कोटींच्या उलाढालीवर पाणी पडले आहे. तसेच या बंदमुळे शासनाच्या तिजोरीलाही २५ ते ३० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. नुकसान सहन करूनही सराफ संघटना मात्र अबकारी कर रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहे. दरम्यान, या बंदमुळे नागरिकांना सोने-चांदी खरेदीच्या हौसेलाही मुरड घालावी लागली आहे.केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी जाहीर केलेल्या अंदाजपत्रकात सोन्याच्या दागिन्यांवर एक टक्का अबकारी कर लावला आहे. या कराला देशात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनने कडाडून विरोध केला. हा कर रद्द करण्याच्या मागणीसाठी फेडरेशनने १ मार्चपासून बंद पुकारला. त्यानुसार पुण्यासह राज्यभरातील सराफांची दुकाने बेमुदत बंद आहेत. सोमवारी या बंदचा चौदावा दिवस होता. पुणे, पिंपरी चिंचवड आणि लगतच्या भागात १७००पेक्षा अधिक सोन्या-चांदीची दुकाने आहेत. यातील एकाही दुकानाचे शटर चौदा दिवसांपासून उघडलेले नाही. फेडरेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. फत्तेचंद रांका यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे व पिंपरी चिंचवड शहरात सराफी बाजारपेठेत दररोज सुमारे १०० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. त्यावर सुमारे १ कोटी रुपये आयकर, सुमारे ३६ लाख रुपये व्याज, यासह एलबीटी व इतर बाबींसह सुमारे पावणेदोन ते दोन कोटी रुपये दररोजचा फटका शासनाला बसत आहे. तसेच या बंदमुळे सराफी दुकानांमधील कामगारांचे पगारही सध्या बंद आहेत. त्यांचे पगार करता येत नाहीत. दरम्यान, सोन्या-चांदीची दुकाने मागील चौदा दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना सोने खरेदीचा पर्यायच उरलेला नाही. सध्या लग्नाचे फारसे मुहूर्त नसले तरी पुढील महिन्यात काही मुहूर्त आहेत. तसेच २५ दिवसांवर गुढीपाडव्याचा सणही आला आहे. मुलांचे वाढदिवस, मुंज, स्वागत समारंभ, तसेच विविध घरगुती कार्यक्रमांची रेलचेल सतत सुरूच असते. त्यासाठी सोन्या-चांदीचे दागिने करण्याची लगबग असते. पण ही लगबग सध्या थंडावली आहे. दुकाने बंद असल्याने नागरिकांच्या हौसेवरही पाणी पडले आहे. सोने खरेदीचा आॅनलाईन पर्याय असला तरी विश्वासार्हतेअभावी त्याकडे लोकांनी दुर्लक्ष केले आहे. सध्या सराफांचा बंद मिटण्याची चिन्हे दिसत नसल्याने नागरिक विशेषत: महिला बाजारपेठ पुन्हा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत.मंगळवारी ठरणार दिशामहाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनने पुण्यात काढलेल्या महामोर्चानंतर अध्यक्ष अ‍ॅड. फत्तेचंद रांका यांनी केंद्र सरकारला १६ मार्चपर्यंत अबकारी कराबाबत निर्णय घेण्याचे आवाहन केले होते. कर रद्द न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. याविषयी बोलताना अ‍ॅड. रांका म्हणाले, सोमवारी संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहे. त्यानुसार आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय मंगळवारी सकाळपर्यंत घेतला जाईल.