शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वीर धरण १०० टक्के भरल्याने १३ हजार ९११ क्युसेक्सने नीरा नदीत पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:23 IST

नीरा देवघर, भाटघर तसेच गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली असून, वीर धरणात गतवर्षीपेक्षा लवकर पाणी जमा झाले.

नीरा - नीरा देवघर, भाटघर तसेच गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली असून, वीर धरणात गतवर्षीपेक्षा लवकर पाणी जमा झाले. धरण १०० टक्के भरल्याने धरणातून १३ हजार ९११ क्युसेक्स वेगाने नीरा नदीत पाणी सोडण्यात आले असून, नीरा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नीरामाई दुथडी भरून वाहत असून, नीरा (ता.पुरंदर) येथील ब्रिटिशकालीन पुलावर तसेच प्रसिद्ध दत्तघाटाच्या पायऱ्यांना पाणी लागल्याने नदीच्या खळाळत्या प्रवाहाचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी नीरा व परिसरातील नागरिक येत आहेत.जिल्ह्यातील धरणक्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाला त्यामुळे गुंजवणी, नीरा देवघर तसेच भाटघर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. वीर धरण परिसरात यंदा जेमतेम पाऊस झाला, मात्र इतर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली. नीरा नदीपात्रातून पाणी वाहत असून, यामुळे पुरंदर, बारामती, इंदापूर, खंडाळा तालुक्यातील शेतीला संजीवनी मिळणार आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नीरा डावा व उजवा कालवा तसेच नदीपात्राच्या कडेच्या पाणीसाठ्यात पाणी जमा होत असून, यामुळे भूजल पातळीत वाढ होणार आहे. चालू हंगामातील बाजरी, भुईमूग, सोयाबीन, फळपिके आदींना पावसाचा तसेच नदीच्या पाण्याचा फायदा होणार आहे. यामुळे हजारो एकर शेतीला फायदा होणार असून, नदीवर बांधलेल्या बंधाºयातही पाणी टिकून राहण्यास मदत होणार आहे. दरम्यान, नीरामाईची ओटी तसेच पूजनाला महिलांनी सुरुवात केली असून, पीकपाणी चांगले येऊन बरकत मिळण्याची प्रार्थना केली जात आहे.पोलिसांचे हवे लक्षनीरा दुथडी भरून वाहत असून, हे दृश्य टिपण्यासाठी अनेक जण पुलावर येत आहेत. मात्र सेल्फी तसेच फोटोग्राफीच्या नादात एखादा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरुणाई येथे मोठ्या प्रमाणावर येत असून त्यांच्या हालचालींकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.या आठवड्यात वीर धरणातून थोड्याफार प्रमाणात पाण्याचा विसर्ग दोन वेळा करण्यात आला. आज गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास नीरा देवघर धरणातून ७९३७ क्युसेक्स, भाटघर धरणातून २३२९ क्युसेक्स तर वीर धरणातून १३९११ क्युसेक्स वेगाने रात्रभर पाणी सोडण्यात येणार आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या