शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

१२ वर्षांची लहानगी जुही बनली हेअर स्टायलिस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 20:57 IST

वयाने लहान असली तरी कर्तृत्वाने महान असलेल्या पुण्याच्या हेअर स्टायलिस्ट जुही सपकेचा प्रेरणादायी प्रवास

पुणे : जुही सपके , वय - अवघे १२ वर्ष...वय जरी लहान  वाटत असले तरी इतर मैत्रिणी अभ्यासात रमल्या असताना ती मात्र ब्युटी इन्स्टिट्यूटमध्ये रमते. आई भक्ती सपके यांच्यात हातात असलेली केश सौंदर्य खुलवण्याची कला जुहीने घेतली असून तिच्या हातून हेअर स्टाईल कारण्यासाठी अनेक जणी गर्दी करत असतात. जुहीच्या आई वडिलांचे पुण्यातील कोरेगाव पार्क भागात इंटरनॅशनल ब्युटी इन्स्टिट्यूट आहे. त्यामुळे लहानपणापासून जुही तिथे जात होती. दोन वर्षांपूर्वी आईसोबत तिथे गेल्यावर कंटाळा आल्याने तिने नकली केस असलेल्या पुतळ्यावर प्रयोग करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिथे असलेल्या प्रशिक्षकांनी तिचे कसब ओळखले. तिथून तिचा केशरचना आणि त्यावर प्रक्रिया करण्याचे शिकण्यास सुरुवात झाली. विशेषतः केशरचनेतले सर्व यंत्र ती लीलयापणे हाताळते. सध्यातरी ती फक्त सुट्टीमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये येते. आजवर तिने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला असून भरपूर बक्षिसेही मिळवली आहेत. इतकी लहान मुलगी केशरचना करणार म्हटल्यावर सुरुवातीला ग्राहक काहीसे आश्चर्यचकित होत असत, तिला जमेल की नाही याबाबत सशांकही असत पण तिचे काम आणि निपुणता बघितली  की त्यांना जुहीच हवी असल्याचा अनुभव जुही सांगते.याबाबत जुहीला विचारले असता तिने याच क्षेत्रात करिअर करणार असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे  तर फक्त केशरचना नव्हे तर सौंदर्य शास्त्रातील प्रत्येक भाग मला शिकायचा असल्याचे ती आवर्जून सांगते. 

 

 

 

 

 

टॅग्स :Puneपुणेfashionफॅशन