शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

रात्री साडे अकरा वाजता पुणे शिक्षक मतदार संघाचा मतांचा कोटा निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 00:24 IST

पुणे शिक्षक मतदार संघातील निकाल जाहीर होण्यास शुक्रवार दिनांक ४ डिसेंबर रोजीची सकाळ उजडण्याची शक्यता आहे.

पुणे : विधान परिषदेसाठी होणाऱ्या पुणे शिक्षक मतदार संघातील मतदार मोजणीची कोटा गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास निश्चित झाला आहे. यामुळे विजयी उमेदवारास एकूण वैध मतांच्या भागीले दोन अधिक एक मते, म्हणजे २५ हजार ११४ मते मिळविणे आवश्यक आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक मतदार संघातील एकूण ५३ हजार १० मते मोजली गेली. यापैकी २ हजार ७८४ मते अवैध ठरली असून, ५० हजार २२६ मते वैध ठरली आहेत. या निवडणुकीत मतमोजणीच्या निकषानुसार पसंती क्रमांकानुसार मतमोजणी होणार असून, पहिल्या पसंती क्रमांक मध्ये एखाद्या उमेदवारास २५ हजार ११४ मते पडल्यास त्यास विजयी घोषित केले जाण्याची शक्यता आहे. मात्र मतांचा हा निश्चित कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या क्रमांकाची मते मोजली जाणार आहेत. यामुळे पुणे शिक्षक मतदार संघातील निकाल जाहीर होण्यास शुक्रवार दिनांक ४ डिसेंबर रोजीची सकाळ उजडण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीच्या जयंत आसगावकर यांना पहिल्या फेरीत १६ हजार ८७४ मतेविजयासाठी पुढील पसंती क्रमांकाच्या मोजणीची वाट पाहावीच लागणार 

पुणे शिक्षक मतदार संघात पहिल्या पसंती क्रमांकाची सर्वाधिक मते पडलेल्या, महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांना १६ हजार ८७४ मते पडली आहेत. मात्र विजयी आकडा गाठण्यासाठी आसगावकर यांना पुढील मोजणीची वाट पाहावी लागणार आहे.पुणे शिक्षक मतदार संघात एकूण ३५ उमेदवार रिंगणात असून, पहिल्या पसंती क्रमांकात आसगावकर यांनी आघाडी घेतली आहे. तर प्रमुख प्रती स्पर्धी व भाजपचे पाठिंबा दिलेल्या उमेदवार जितेंद्र पवार यांना ५ हजार ७९५ मते मिळाली आहेत. तर विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांना ११ हजार २४ मते मिळाली आहेत. यामुळे विजयी उमेदवारास २५ हजार ११४ मतांची आवश्यकता आहे.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक