शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

काळा बाजार करणा-या ११२ दुकानांचे परवाने रद्द; हजारो टनचा धान्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 03:24 IST

रेशनिंगवरील गहू, तांदूळ हे धान्य आणि केरोसिनची काळ््याबाजारात विक्री केल्याचे सिद्ध झाल्याने अन्नधान्य वितरण कार्यालयाने (एफडीओ) गेल्या सात वर्षांत तब्बल ११२ धान्य दुकानदारांचे परवाने कायमस्वरुपी रद्द केले आहेत. यातील १२ परवाने गेल्या वर्षभरात रद्द करण्यात आले आहेत. या कारवाईत हजारोटन धान्यसाठा आणि सुमारे १३ हजार लिटर केरोसिनचा साठा जप्त करण्यात आला आहे.

- विशाल शिर्केपुणे : रेशनिंगवरील गहू, तांदूळ हे धान्य आणि केरोसिनची काळ््याबाजारात विक्री केल्याचे सिद्ध झाल्याने अन्नधान्य वितरण कार्यालयाने (एफडीओ) गेल्या सात वर्षांत तब्बल ११२ धान्य दुकानदारांचे परवाने कायमस्वरुपी रद्द केले आहेत. यातील १२ परवाने गेल्या वर्षभरात रद्द करण्यात आले आहेत. या कारवाईत हजारोटन धान्यसाठा आणि सुमारे १३ हजार लिटर केरोसिनचा साठा जप्त करण्यात आला आहे.शिधापत्रिकाधारकांना २ रुपये किलो दराने गहू, ३ रुपये किलो तांदूळ आणि केरोसिन १५.४५ रुपये लिटर दराने मिळते. सध्या शहरातील केरोसिनचा कोटा पूर्ण रद्द केला आहे. एफडीओच्या भरारी पथकाने दुकानांची अचानक तपासणी केल्यावर मिळालेले आणि शिधापत्रिकाधारकांना वितरीत केलेले धान्य याचा मेळ काही लागत नाही. त्यावरुन संबंधित दुकानदाराने धान्याचा काळाबाजार केल्याचे निष्पन्न होते. अनेकदा पोलिसांच्या कारवाईतही काळाबाजार करणारे समोर येतात. त्या नुसार एफडीओ कार्यालयाकडून परवाना रद्दची अथवा दंडात्मक कारवाई केली जाते.गेल्या सात वर्षांत अशा जवळपास अडीचशे रेशनिंग दुकानांवर कारवाई झाली असून, त्यातील ११२ दुकानदारांनी धान्याचा अपहार केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जयप्रकाश उणेचा यांनी ही माहिती उघड केली आहे.कारवाईतही तफावतपरिमंडळ ड मधील काकासाहेब महादेवराव कांबळे यांच्या दुकानात २५६ किलो गहू अणि ७.५३ किलो तांदळाची तफावत आढळल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यात आला. मात्र, गजानन डी बाबर या ज परिमंडळातील परवानाधारकाकडे ३०० किलो तांदळाची तफावत आढळूनही त्यांना केवळ ९ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. अ परिमंडळातील बी. डी. औसरमल या परवानाधारकाने २२ क्विंटल गहू आणि १९ क्विंटल तांदळाची तफावत आढळली असून, त्यांना १ लाख १२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मात्र, त्यांचा परवाना रद्द झाल्याची नोंद कागदपत्रात आढळून येत नाही.

टॅग्स :Puneपुणे