शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

उरुळी कांचनमध्ये दोन ट्रकच्या अपघातात ११ जखमी; अवैध प्रवासी, वाळू वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 18:55 IST

मंगळवारी पहाटे उरुळी कांचननजीक झालेल्या दोन ट्रकच्या अपघातात ११ जण जखमींपैकी ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताने अवैध प्रवासी वाहतुकीचा व अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देअपघातात टायर वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील एकूण ११ जण जखमीअपघातानंतर वाळू वाहतूक करणारा ट्रकचालक गाडीसह फरार

उरुळी कांचन : मंगळवारी पहाटे उरुळी कांचननजीक झालेल्या दोन ट्रकच्या अपघातात ११ जण जखमींपैकी ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताने अवैध प्रवासी वाहतुकीचा व अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याला आळा घालण्यासाठी सरकार दरबारी काहीच ठोस पावले उचलली जात नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचा बळी यात जातोय हे वास्तव पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) गावाच्या हद्दीत खेडेकरमळा येथे टायर वाहतूक करणारा ट्रक व वाळूचा ट्रक यांच्यात मंगळवारी (ता. २०) पहाटे झालेल्या अपघातात टायर वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील एकूण ११ जण जखमी झाले. जखमींपैकी चालक, क्लीनर यांच्यासह दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर वाळू वाहतूक करणारा ट्रकचालक गाडीसह फरार झाला आहे.  जखमींमध्ये आरुबाई राजू मखरे (वय  ३), रुहीबाई राजू मखरे (वय २), प्रतिभा राजू मखरे (वय  ३०), पार्वती बाबूराव गायकवाड (चौघे रा. राजवाडा, ता. इंदापूर), पिराजी लक्ष्मण मिसाळ (वय ४०), स्वाती भागवत मिसाळ (वय  २८), हरिवंदा प्रवीण गायकवाड (वय ५०), सुमन चंद्रगुप्त गायकवाड (वय २८), संजयकुमार रामचंद्र रगारे (वय ४५, पाचही रा. बसवकल्याण, ता. हाळी, कर्नाटक), चालक आशिफ शेख (वय २६) क्लीनर महंमद युसुफ (वय २४, दोघेही रा. बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक) यांचा समावेश आहे. जखमींपैकी चालक आशिफ शेख, क्लीनर महंमद युसुफ यांच्यासह हरिवंदा गायकवाड व स्वाती मिसाळ यांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर वाळू वाहतूक करणारा ट्रकचालक गाडीसह फरार झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून इंदापूर व कर्नाटक येथे जाण्यासाठी काही प्रवासी टायर वाहतूक करणाऱ्या गाडीतून प्रवास करत होते. मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ते उरुळी कांचन येथील खेडेकरमळा परिसरात आले. याचवेळी खेडेकरमळा येथील ओढ्याच्या बाजूने वाळूने भरलेला ट्रक पुणे-सोलापूर महामार्गावर आला. अचानकसमोर आलेला वाळूचा ट्रक पाहून चालक आशिफ शेख याचा गाडीवरील ताबा सुटला व तो अचानकपणे आडवा आलेल्या वाळूच्या ट्रकला जाऊन धडकला. या अपघातातील जखमींना अजिनाथ कदम व कस्तुरी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी मदत करून आपल्या रुग्णवाहिकेतून लोणी काळभोर (ता. हवेली) खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलीस अधिकचा तपास करीत आहेत.

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनPuneपुणे