शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

अकरा कोटींची फसवणूक; चार व्यावसायिकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:00 IST

कल्याणी टेक्नोथर्म लिमिटेड, कल्याणी टेक्नोवेल्ड प्रा. लि. आणि कल्याणी थर्मल प्रोसेसिंग प्रा. लि. या कंपन्यांमध्ये अकाऊंटिंग व बँकिंगचे काम करणा-या एकाने कंपनीच्या बँकेच्या विविध खात्यांवरून ११ कोटी २२ लाख ७९ हजार २१८ रुपये अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघडकीस आला.

पुणे : कल्याणी टेक्नोथर्म लिमिटेड, कल्याणी टेक्नोवेल्ड प्रा. लि. आणि कल्याणी थर्मल प्रोसेसिंग प्रा. लि. या कंपन्यांमध्ये अकाऊंटिंग व बँकिंगचे काम करणा-या एकाने कंपनीच्या बँकेच्या विविध खात्यांवरून ११ कोटी २२ लाख ७९ हजार २१८ रुपये अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघडकीस आला आहे. अपहार केलेली रक्कम त्याने लॉटरी खेळण्यासाठी वापरल्याचेदेखील निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी चार लॉटरी व्यावसायिकांना अटक केली आहे. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी चौघांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.दीपक भरत गायकवाड (वय ३३, रा. पर्वतीदर्शन), दिलीपकुमार गोवर्धनभाई अकबारी (४२, रा. सुयोग निवास, बालाजीनगर, धनकवडी) गणेश नंदकुमार पोटफोडे (३५) आणि महेश वसंत जाधव (४८, दोघेही रा. पर्वतीदर्शन) यांना अटक आरोपींची नावे आहेत. तसेच या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी नीलेश अशोक गायकवाड याचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार २०१३ ते आॅगस्ट २०१७ या कालावधीत घडला.याप्रकरणी कंपनीच्या फायनान्स विभागाचे उपाध्यक्ष कमलेश नलिन शाह (४४, रा. बोआविस्टा, कल्याणीनगर) यांनी याबाबत २८ आॅगस्ट २०१७ रोजी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.>तपासात उघडशहा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नीलेश गायकवाड हा सहायक व्यवस्थापक म्हणून काम करत होता.त्यासाठी लॉटरी व्यावसायिक दीपक गायकवाड याच्याबरोबर ४९ लाख ४९ हजार, दिलीपकुमार अकबारी ४५ लाख ५० हजार, गणेश पोटेफोडे ३८ लाख ९९ हजार रुपये, तर महेश जाधव यांच्यासोबत तब्बल १ कोटी ६ लाख ६५ हजार रुपयांचे व्यवहार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.