शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

स्थायीचे १०० कोटींचे उड्डाण

By admin | Updated: May 22, 2017 05:05 IST

महापालिका निवडणुकीपूर्वी भक्ती-शक्ती चौकात उड्डाणपूल उभारण्याचा विषय राष्ट्रवादी काँगे्रसने स्थायी समितीसमोर आणला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिका निवडणुकीपूर्वी भक्ती-शक्ती चौकात उड्डाणपूल उभारण्याचा विषय राष्ट्रवादी काँगे्रसने स्थायी समितीसमोर आणला होता. मात्र, भाजपाच्या नेत्यांनी श्रेयवादामुळे या विषयाला खोडा घातला होता. महापालिका निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या भाजपाने नव्वद कोटींचा विषय स्थायी समितीसमोर आणला आहे. निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते दापोडी हा रस्ता पिंपरी- चिंचवड महापालिकेतर्फे विकसित केला आहे. या मार्गावर सार्वजनिक बीआरटीएस बस वाहतूक सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. परंतु, याठिकाणी असलेल्या चौकामुळे लहानमोठे अपघात नेहमीच होत असतात. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे आणि वाहतुकीची कोंडीही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी या चौकात ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सुमारे १३५ करोड रुपये खर्चाला महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच्या सर्वसाधारण सभेत मान्यता दिली होती. मात्र, त्यानंतर शंभर कोटींच्या कामावरून राष्ट्रवादी आणि भाजपात श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले. हा प्रस्ताव तत्कालीन स्थायी समिती सभेसमोर येऊच दिला नाही. भाजपाची सत्ता आल्यानंंतर मंगळवारी होणाऱ्या स्थायी समिती सभेसमोर हा प्रस्ताव मंजुरीसाठी आला आहे. चार ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी एका कंपनीकडून ९० कोटी रुपये खर्चात काम करून घेण्यात येणार आहे. सभेत पहिल्यांदाच १०० कोटींची कामे सभापटलावरस्थायीच्या सातव्या सभेत पहिल्यांदाच १०० कोटींची कामे मंजुरीसाठी विषयपत्रिकेवर ठेवली आहेत. त्यामध्ये भक्ती - शक्ती चौकातील उड्डाणपूल (९० कोटी), पाणी शुद्धीकरण प्रक्रियेसाठी आवश्यक द्रवरूप पॉली अ‍ॅल्युमिनिअम क्लोराईड खरेदी (१ कोटी ८३ लाख), पावडर पॉली अ‍ॅल्युमिनिअम क्लोराईड खरेदी (६४ लाख ५८ हजार रुपये), विविध उद्यानांचे देखभाल- संरक्षण (२ कोटी ८० लाख), महिलांकरिता स्वच्छतागृह बांधणे (१४ लाख), ब आणि क क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील घरोघरचा कचरा वाहनामार्फ त गोळा करून संकलन केंद्रात वाहून नेणे (१ कोटी १६ लाख), रस्ते व चौकामध्ये पादचाऱ्यांसाठी सुविधा पुरविणे (१३ लाख), मराठी, उर्दू माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तके खरेदी करणे (५ लाख ५३ हजार रुपये) आदी कामांचा समावेश आहे. असा असेल पूल पुणे-मुंबई महामार्गावर प्राधिकरण येथे भक्ती-शक्ती चौक आहे. या चौकातील प्रत्येक दिशेला जाणारे वाहन समगतीने फिरते राहून चौक ओलांडण्याचे नियोजन केलेले आहे. चौकाजवळच शहराचा मानबिंदू असणारा भक्ती-शक्ती शिल्पसमूह आहे. त्याचे सौंदर्य कोठेही कमी होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. रोटरीमुळे पादचाऱ्यांना चौकाच्या कोणत्याही दिशेने ये- जा करणे शक्य होणार आहे. नियोजित उड्डाणपुलाचे क्रॅश बॅरिअर हे भक्ती- शक्ती शिल्पाच्या तळाशी समपातळीमध्ये आहे. यामुळे बसमधील प्रवाशांनादेखील पुलावरून संपूर्ण शिल्पाचे दर्शन होणार आहे. भक्ती- शक्ती चौकामध्ये तीन लेव्हलमध्ये बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच ग्रेडसेपरेटर स्पाइन रस्त्याला समांतर आणि येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन असणार आहे. प्राधिकरण ते मोशी दक्षिण- उत्तर वाहतुकीमुळे शहर जोडणार असून, त्याची लांबी ४२० मीटर आणि २४ मीटर रुंदीच्या दोन लेन, ५.५० मीटर उंची असणार आहे. नाशिक महामार्गाकडून देहूरोड - कात्रज बावधन मार्गाकडे जाणारी जड वाहने ग्रेडसेपरेटरमधून जाण्याची व्यवस्था केलेली आहे.