शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे नैसर्गिक स्रोत जपण्यासाठी १ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:50 IST

बावधन झऱ्यातून येते रोज दीड लाख लिटर स्वच्छ पाणी

पुणे : शहरातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत असणारे झरे वाचविण्यासाठी पुणे महापालिकेच्या प्रशासनाने येत्या आर्थिक वर्षासाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये बावधन येथील झरा आणि सिद्धेश्वर-वृद्धेश्वर झºयांचा उल्लेख करण्यात आला असून, त्यांचे संवर्धन या तरतूदीमधून होऊ शकेल. पिण्यासाठी दररोज लाखो लिटर पाणी या झºयांमधून मिळणार आहे. या झºयाबाबत ‘लोकमत’ने वृत्त देऊन तरतूद करण्याची मागणी केली होती.

पुणे महापालिका प्रशासनाने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी आज सहा हजार कोटींचे अंदाजपत्रक सादर केले आहे. यामध्ये प्रथमच पाण्याचे नैसर्गिक स्रोत वाचविण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. बावधन येथील झरा दररोज दीड लाख लिटर स्वच्छ पाणी देतो. त्यामुळे हा झरा वाचविला पाहिजे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून जलप्रेमी शैलेंद्र पटेल प्रयत्न करीत आहेत. सध्या या झºयातील पाणी वाया जात असून, आजूबाजूच्या महिला कपडे धुण्यासाठी त्याचा वापर करतात. परंतु, भूगर्भ विभागाकडून या पाण्याचे परीक्षण झाले असून, ते पिण्यायोग्य असल्याचा अहवाल अधिकाºयांनी दिल्याचे पटेल यांनी सांगितले.लाखो लिटर पाणी मिळू शकतेसध्या पिण्याच्या पाण्यावरून महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात चांगली जुंपली आहे. त्यामुळे या झºयातील लाखो लिटर पाणी वाचविले, तर त्याचा फायदा पुणेकरांना होईल. इकॉलॉजिकल सोसायटी, डेक्कन कॉलेज, भूगर्भ जल विभाग यांनी या झºयाबाबत परीक्षण केले आहे. या सर्वांनी हे पाणी पिण्यासाठी योग्य असल्याचे नमूद केले आहे.या झºयाचे संवर्धन करायचे असेल, तर तेथील जागा महापालिकेने ताब्यात घेतली पाहिजे. तरच, हा झरा आरक्षित होऊ शकतो. तसेच या झºयाला हेरिटेजचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे पटेल यांनी सांगितले. बावधनच्या झºयाच्या आजूबाजूला जैवविविधता आहे. त्यामुळे येथे जैवविविधता उद्यान उभारले पाहिजे. विद्यार्थ्यांना या ठिकाणी येऊन झरा काय असतो, त्याचाही अभ्यास करता येईल, असेही पटेल म्हणाले.

टॅग्स :Waterपाणी