शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला विद्यमान खासदारांवर भरोसा नाही, योगींचे मंत्री उतरणार लोकसभेच्या मैदानात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 09:41 IST

2019च्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे.

नवी दिल्ली- 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे. मतदानाची तारीख जाहीर झाल्यापासून आता पक्षांनी कोणत्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे, यावर लक्ष केंद्रित केलं आहे. सर्वच पक्षांच्या यासंदर्भात बैठकांवर बैठक सुरू आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये महागठबंधननं भाजपाच्या डोकेदुखीत वाढ केली आहे.विरोधकांची एकजूट पाहता भाजपाही एक नवी रणनीती आखण्याचा तयारीत आहे. सर्वाधिक लोकसभेच्या 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपाच्या दोन डझनांहून अधिक खासदारांचे पत्ते कट होण्याची शक्यता आहे. या विद्यमान खासदारांच्या जागी योगी मंत्रिमंडळातील मंत्र्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं भाजपाच्या विचाराधीन आहे. भाजपानं एक अंतर्गत सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये मोदी लाटेत जिंकलेल्या अनेक खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील जनता पसंत करत नसल्याचं समोर आलं आहे. त्याच ज्या खासदारांबाबत मतदारसंघात असंतोषाचं वातावरण आहे. तसेच जे खासदार त्यांच्या मतदारसंघात लोकप्रिय नाही. त्यांना पुन्हा तिकीट न देण्यासंदर्भातही भाजपानं जवळपास निश्चित केलं आहे.योगींचे मंत्री लढणार लोकसभा निवडणूकभाजपा योगी सरकारमधील 10 ते 12 मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, रिटा बहुगुणा जोशी, बृजेश पाठक, स्वामी प्रसाद मौर्य, दारा सिंह चौहान, एसपी सिंह बघेरसह अनेक नावांचा या यादीत समावेश आहे. येत्या दोन-तीन दिवसांत भाजपा पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची घोषणा करणार आहे.भाजपानं केले अंतर्गत सर्व्हेभाजपानं लोकसभा निवडणुकीसंदर्भात अंतर्गत सर्व्हे केला आहे. विशेष म्हणजे संघानंही अशाच प्रकारचा एक सर्व्हे केला असून, खासदारांची मतदारसंघातील कामे, त्यांचा प्रभाव यासंदर्भात एक अहवालही तयार केला आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तो अहवालही सोपवण्यात आला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९