कोल्हापूर -राज्यात सरकार स्थापन करतेवेळी मी भाजपसोबत जावे यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी माझ्यावर दबाव टाकला होता अशी कबुली आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे. शुक्ला यांनी दबाव टाकला होता असे व्टिट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्याला यड्रावकर यांच्या कबुलीने पुष्टी मिळाली आहे. ही बाब मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याही कानावर घातल्याचे यड्रावकर म्हणाले.सरकार स्थापन करताना यड्रावकर यांच्यावर रश्मी शुक्ला यांनी दबाव टाकला होता असे व्टिट आव्हाड यांनी केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. यानंतर यड्रावकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी संध्याकाळपर्यंत फोन न उचलण्याची भूमिका घेतली होती. संध्याकाळी मात्र त्यांनी ही कबुली दिली. आपल्याच ज्येष्ठ मंत्र्यांनी व्टिट केल्यानंतर त्याला दुजोरा देण्यासाठी यड्रावकर यांनी इतका वेळ का घेतला अशीही विचारणा होत आहे.यड्रावकर म्हणाले, त्या काळामध्ये मी भाजपसोबत जावे यासाठी शुक्ला मला भेटल्या होेत्या. मात्र मी ज्या माझ्या तालुक्यातील जनतेने निवडून दिले आहे त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय निर्णय घेणार नसल्याचे सांगितले. त्यानुसार मेळावा घेवून मते अजमावून शिवसेनला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
होय, मला रश्मी शुक्ला यांनी दबाव आणला होता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 19:23 IST
minister kolhapur- राज्यात सरकार स्थापन करतेवेळी मी भाजपसोबत जावे यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी माझ्यावर दबाव टाकला होता अशी कबुली आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे. शुक्ला यांनी दबाव टाकला होता असे व्टिट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्याला यड्रावकर यांच्या कबुलीने पुष्टी मिळाली आहे. ही बाब मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याही कानावर घातल्याचे यड्रावकर म्हणाले.
होय, मला रश्मी शुक्ला यांनी दबाव आणला होता
ठळक मुद्देहोय, मला रश्मी शुक्ला यांनी दबाव आणला होता राजेंद्र पाटील यड्रावकर यांची कबुली