शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

एकदा लिहून द्या, रोहिंग्यांना बाहेर काढायची जबाबदारी माझी; अमित शहांचा ओवेसींना टोला

By बाळकृष्ण परब | Updated: November 29, 2020 17:04 IST

Amit Shah News : ओवेसी यांनी एकदा लिहून द्यावे, नंतर रोहिंग्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी माझी असेल, असे आव्हान अमित शाहा यांनी दिले.

ठळक मुद्देओवेसींनी एकदा लिहून द्यावे की बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बाहेर काढा म्हणून नंतर रोहिंग्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी माझी असेलघुसखोरांवर कारवाई केल्यानंतर विरोधी पक्ष गोंधळ घालायला सुरुवात करतात, असेही अमित शाह म्हणाले

हैदराबाद - ग्रेटर हैदराबाद विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार प्रचार सुरू केला आहे. पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी हैदराबादमध्ये शक्तिप्रदर्शन केले. तसेच हैदराबादमधील प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या असदुद्दीन ओवेसी यांनाही अमित शाहा यांनी टीकेचे लक्ष्य केले आहे. ओवेसी यांनी एकदा लिहून द्यावे, नंतर रोहिंग्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी माझी असेल, असे आव्हान अमित शाहा यांनी दिले. तसेच घुसखोरांवर कारवाई केल्यानंतर विरोधी पक्ष गोंधळ घालायला सुरुवात करतात, असेही अमित शाह म्हणाले.रोहिंग्यांच्या प्रश्नावर भाष्य करताना अमित शाह म्हणाले की, ओवेसींनी एकदा लिहून द्यावे की बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बाहेर काढा म्हणून. त्यानंतर मी काहीतरी करतो. मात्र आम्ही जेव्हा कायदा करतो तेव्हा हे लोक संसदेमध्ये गोंधळ घालतात. काही दिवसांपूर्वी रोहिंग्यांच्या मुद्द्यावरून ओवेसींनी अमित शाहांना टोला लगावला होता. जर हैदराबादमध्ये अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्या राहत असतील तर अमित शाह कारवाई का करत नाहीत. ओवेसींच्या याच टिप्पणीलाअमित शाहांनी प्रत्युत्तर दिले आहे.हैदराबादमध्ये महानगरपालिका निवडणूक जिंकून तेलंगाणामध्ये राजकीय आघाडी घेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. गृहमंत्री अमित शाहा यांनी आज रोड शो करून या निवडणुकीत भाजपाच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्यासाठी प्रयत्न केला. तसेच रोड शो पूर्वी अमित शाहा यांनी भाग्यलक्ष्मी मंदिरात पूजा केली. रोड शो आटोपल्यानंतर अमित शाहा यांनी हैदराबादच्या निवडणुकीत भाजपा बहुमत मिळेल, असा आत्मविश्वास व्यक्त केला.हैदराबादच्या महानगरपालिकेच्या १५० जागांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अमित शाहा यांनी या निवडणुकीसाठी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रोड शो केला.

टॅग्स :Amit Shahअमित शहाAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपाPoliticsराजकारण