शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई महानगरपालिकेत महाविकास आघाडी एकत्र लढणार? की... अजित पवारांचं मोठं विधान...

By बाळकृष्ण परब | Updated: January 7, 2021 13:06 IST

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीबाबत सूचक आणि मोठे विधान केले आहे.

ठळक मुद्देमित्रपक्षांसोबत मिळून ही निवडणूक लढवावी, अशी चर्चा सुरू आहेया बाबतचा अंतिम निर्णय शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे घेणार आहेतआघाडी करून लढल्याने मतविभागणी रोखता येईल. अन्यथा तुला नाही मला, दे तिसऱ्याला असं होईल

मुंबई - देशातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला आता केवळ वर्षभराचा अवधी राहिला आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने कंबर कसली आहे. काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत तर गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेतील सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून ही निडणूक महाविकास आघाडी करून लढण्याबाबत चाचपणी सुरू आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीबाबत सूचक आणि मोठे विधान केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी करून लढण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे संकेत अजित पवार यांनी दिले आहे.मुंबई महानगरपालिकेतील निवडणुकीच्या रणनीतीबाबत अजित पवार म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेमध्ये आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मित्रपक्षांसोबत मिळून ही निवडणूक लढवावी, अशी चर्चा सुरू आहे. मात्र या बाबतचा अंतिम निर्णय शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे घेणार आहेत. आघाडी करून लढल्याने मतविभागणी रोखता येईल. अन्यथा तुला नाही मला, दे तिसऱ्याला असं होईल, असे अजित पवार म्हणाले.दरम्यान, मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत काँग्रेसचे नेते देत आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी सांगितले की याविषयावर आम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून मार्ग काढणार आहोत.सध्या मुंबई महानगरपालिकेची सत्ता ही शिवसेनेच्या ताब्यात आहे. २०१७ मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना मोठा पक्ष ठरला होता. मात्र त्या निवडणुकीत भाजपाने मोठी मुसंडी मारत दुसरे स्थान पटकावले होते. तर काँग्रेसची तिसऱ्या क्रमांकावर घसरगुंडी उडाली होती.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीPoliticsराजकारणMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाElectionनिवडणूक